एका बातमीमुळं मुख्यमंत्रीपदानं ‘या’ नेत्याला दिला ‘गुलीगत धोका’!.

 

इंदिरांनी आणीबाणी मागे घेतली वर्ष होतं १९७७, जनता दल सरकार चालण्यास असमर्थ आहे, असं जनतेला जाणवलं आणि इंदिरा गांधींना प्रचंड बहुमतासाह दिल्लीच सिंहासन मिळालं. सत्तेवर येताच काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांवर इंदिरांची नजर पडली आणि राज्यांमध्ये सत्ताबदल झाला. आणि आता क्रमांक होता महाराष्ट्राचा.

 

काँग्रेसची फारकत घेतलेल्या शरद पवारांनी पुलोदची निर्मीती करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवले पण ते दोन वर्षांपेक्षा जास्त टिकले नाही. इंदिरांच्या शिफारशीवर पुलोद सराकार बराखास्त करत राष्ट्रपती राजवट लागु केली. महाराष्ट्रात पुन्हा मध्यवर्ती निवडणूक जाहिर झाल्या पुन्हा निवडणूक झाली आणि कॉंग्रेस सत्तेवर परतली. मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचात अनेक दिग्गज कॉंग्रेसनेत्यांना बाजूला सारत इंदिरांच्या मर्जितले बॅरिस्ट अब्दूल रहमान अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.अंतुले मुख्यमंत्री पदाचं एक वर्ष पुर्ण करतात न करतात तोवर इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीची राजकीय वर्तुळात चर्चा व्हायला लागली. या बातमीने अंतुलेंच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला इंदिरा गांधींसाठी हा मोठा धक्का होता.  १९७२ ते १९७४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना ज्या वॉटर गेट स्कँडलसाठी राजीनामा द्यावा लागला.  भारतीय माध्यमांनी याला अंतुलेंच वॉटरगेट स्कँडल असं नाव दिलं. सामान्य जनतेतही या सिमेंट घोटाळ्याची चर्चा वाढू लागली.

अरुण शौरींनी केला भांडाफोड

राजकीय वर्तुळात अंतुलेंना राजकारणाचा नेपोलियन मानलं जायचं.. प्रदिर्घ राजकारणात या आधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हेत. १९८० च्या विधानसभा निवडणूकीच्या विजयानंतर कॉंग्रेसने महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा हस्तक्षेप असणाऱ्या मराठा समाजास नेतृत्व सोपवण्याची परंपरा मोडत इंदिरांनी कोकनाच्या एका मुस्लीम बॅरिस्टरला राज्याच्या सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसवलं. शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेलं रायगड अंतुलेंचं विधानसभा मतदारसंघ होता.

 

ए.आर. अंतुलेंच राजकारण संजय गांधी स्टाइल ऑफ पॉलिटीक्सच होतं. त्यामुळे ते धडाडीने निर्णय घेत जिल्ह्यांची विभागणी करत अनेक छोट्या जिल्ह्यांची त्यांनी निर्मिती केली. यामुळे प्रशासन चालवण अधिक सोप्प बनलं. गरीबांसाठी संजय गांधी निराधा योजनासुरु केली. आमदार आणि माध्यम कर्मींसाठी घरं उपलब्ध करण्याचा महत्वाचा निर्णय ही त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी अनेक ट्रस्ट स्थापन केल्या आणि हीच त्यांची घोडचुक ठरली.

 


जागतिक बँकीची नोकरी सोडून भारतात परतलेले अर्थतज्ञ अरुण शौरी यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात काम करायला सुरुवात केली. याच वर्तमानपत्राने इंदिरांनी लागू केलेल्या आणीबाणीचा कडवा विरोध केला होता.  ३१ ऑगस्ट १९८१ ला इंडियन एक्सप्रेसमध्ये ७५०० शब्दांचा सविस्तर एक रिपोर्ट प्रकाशित झाला ज्यात मुख्यमंत्र्यांनी सर्व नियम आणि कायद्यांना धाब्यावर बसवत. विविध ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये जमवले आणि बिझनेस लॉबीला ही फायदा पोहचवला. याचे सविस्तर विवेचन केले होते.

नेमका काय होता घोटाळा ?

अंतुलेंनी सात ट्रस्ट बनवल्या होत्या. इंदिरा गांधी प्रतिभा ट्रस्टमध्ये रक्कम दान करणाऱ्या व्यापाऱ्यांकडूनच मुंबईत सुरूअसणाऱ्या महत्त्वाच्या इमारती बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटची खरेदी अतिरिक्त किंमतीने करत उद्योगपती आणि बिल्डरांना अधिकचा नफा पोहचवला. इंदिरा गांधी प्रतिभा ट्रस्टमध्ये ५.२ करोड रुपये जमले तर एकुण सातही ट्रस्टमध्ये जमलेली रक्कम ३० करोड रुपयाहून अधिक होती. १९८० मध्ये ही रक्कम भरपूर मोठी होती. सर्व पैसा चेक आणि डीडीच्या माध्यमातून जमा झाला असला तरी या पब्लिक ट्रस्टचे सर्व सदस्य त्यांच्या परिवारातले होते. यामुळे हा पैसा अंतुलेंच्या तिजोरीतच जमा होतोय असं अरुण शौरींनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहलं होत.  सिमेंट खरेदी प्रक्रीयेत केलेला बदल, चीनी कंपन्यांना केलेली मदत, मोठे प्रोजक्ट देण्यासाठी बिल्डर्सकडून घेतलेले पैसे असे अनेक आरोप या रिपोर्टमध्ये होते.

 प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहचलं तेव्हा प्रसिद्ध कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी अंतुलेंकडून फीस न घेता त्यांची न्यायालात बाजू मांडली. या प्रकरणात न्यायाधीश बख्तावर लँटीन यांनी अंतुलेंना दोषी ठरवलं.अखेर अंतुलेंना व्हाव लागलं पायउतार

उच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर अखेर पक्षाने कारवाई करत एआर अंतुलेंना पदावरून हटवलं. जानेवारी १९८२च्या संसदेच्या हिवाळी अंतुलेंच्या सिमेंट घोटाळ्यावर सलग ९ तास चर्चा चालली देशभरात या प्रकरणाची चर्चाही झाली. उच्च न्यायालायाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालायत आव्हान दिल्यानंतर पुरेशा पुराव्या अभावी एआर अंतुलेंची निर्दोष मुक्तता झाली. आणि अंतुलेंनी केंद्राच्या राजकारणाकडे मोर्चा वळवला.

शोधपत्रकारीतेचा पहिला बळी

वर्तमानपत्रात रिपोर्ट, सिमेंट घोटाळ्याचा पर्दाफाश आणि राजीनामा पायउतार होणारा मुख्यमंत्री. या घोटाळ्याची नाट्यमयता एखाद्या चित्रपटाला साजेशी ठरेल अशी आहे आणि या कथेचे हिरो ठरले, ‘अरुण शौरीवर्तमानपत्रातील घोटाळ्याच्या बातममुळं राजनेत्याला पदउतार व्हावं लागलं असेल ही भारतातील पहिलीच वेळ. एआर अंतुले शोधपत्रकारीतेचे पहिले बळी ठरले. तत्कालीन

खासदार पीलु मोदी म्हणाले होते की, ‘ विचार करा की भारतात जर अरुण शौरींसारखे आणखी दहा पत्रकार तयार झाले तर भारताचा चेहरा मोहरा बदलेल’.

 

1,299 comments