जगातलं पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स मिळवलं अन् उभारली मर्सेडीज् बेंझ कंपनी

 

मर्सेडीज् बेंझ. आज बाजारात कितीही अलिशान गाड्या असल्यातरी मर्सेडीज् बेंज आजही श्रीमंतीचं प्रतिक म्हणून जगभरात ओळखली जाते. याच कंपनीने अधुनिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा पाया घातला होता.

१५० वर्षापासून या कंपनीला टक्कर देण्यासाठी अनेक कंपन्या आल्या आणि गेल्या ही मात्र मर्सेडीज् आपला करिष्मा अजून ही टीकवून आहे. एका सायकल दुकानदारानं हे मर्सेडी़ज् नावचं साम्राज उभारलं होतं.

इतिहास

१९ व्या शतकाच्या शेवटीची ही गोष्ट. प्रवसासाठी लोक घोडागाडीचा वापर करायचे. सायकलीचाही अविष्कार झाला. डॅनवर नावाचा जर्मन गृहस्थ इंधनावर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावण्यात व्यस्थ होता तर बेंझ सायकलच्या उपयोगाने चार चाकी वाहन बनवण्याचं काम सुरु होतं. दोघे जर्मनीचे पण कधीही एकमेकांशी भेटले नव्हते.

 

बेंझ यांनी  Benz & Co Rheinische Gasmotorenfabrik या कंपनीची १९८३ ला स्थापना केली आणि १९८६ ला त्यांच्या जिद्दीने अविष्कार घडवलं मोटरवॅगन नावच्या चारचाकी वाहनांसाठीचं इंजिन त्यांनी बनवलं. जगातलं पहिलं कार इंजिन बनवण्याचा मान त्यांना मिळाला.

 

पुढं डॅमलर यांनी ही १८९० ला Daimler-Motoren-Gesellschaft (DMG) नावची कार उत्पादक कंपनी उघडली. बाईक, कार व बोट यांच्यात वापरता येईल असं इंजिन त्यांनी बनवलं. हे इंजिन दिसायला छोट असलं तरी त्याची ताकद प्रचंड होती.

डॅमलर यांच्या अविष्काराची सर्वत्र चर्चा  झाली. पण उद्योग उभा करण्यासाठी त्यांना गुंतवणूकदार मिळाले नाहीत. त्याच्या मृत्यूनंतर कंपनीची जबाबदारी त्यांचे सहकारी मेचाब यांच्यावर आली. त्यांनी गुंतवणूक मिळवली. आणि इंजिन उत्पादनाला सुरुवात झाली.

बेंझ आणि डॅमलर दोघांनी अनेक वाहन, नौकांची इंजिन बनवली. एकमेकांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या या दोन्ही कंपनी प्रमुखांनी कधी विचार ही केला नव्हता की एक दिवस ते एकत्र येवून जगाचा इतिहास बदलतील.

 

पहिल्या कारने जगभरात मिळवून दिली ओळखली

पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. आणि दोन्ही कंपन्यांच्या वाहन विक्रीत कमालीची  घट झाली. जर्मनीवर युद्धाचा वाईटच परिणाम झाला. इंधनाची निर्यात थांबली. युद्धासाठी जर्मन सैन्याची वाहन या दोन्ही कंपन्यांनी बनवायला सुरुवात केली.  

कार उद्योगात नव्या नव्या कंपन्या उतरत होत्या. जर्मनीतील मंदी आणि वाढती स्पर्धा यात टिकून राहण्यासाठी बेंझ आणि मेचाब यांनी दोन्ही कंपन्यां एकत्र करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांची पुरेशी ओळख नसताना देखील या कंपन्या एक झाल्या आणि Daimler-Benz जन्माला आली.

पहिल महायुद्ध १९१८ ला संपल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी कार प्रोडक्शन सुरु केलं. आपआपल्या डिझाईनवर काम करत अनेक नव्या गाड्या बाजारात आणल्या.

 

 Mercedes-Benz W15 या कंपनीने बाजारत धुमाकुळ घातला. त्यावेळी विक्रमी ७००० गाड्या विकल्या. पुढच्याच वर्षी मर्सेडीज् बेंझ जगातल्या प्रमुख कार निर्माता कंपन्यांच्या यादीत सामील झाली.

 

दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलरच्या सैन्यासाठी कार, हत्त्यारे, विमानांची व पाणबुड्यांची इंजीने या कंपनीने बनवली.एका हाताला अधुनिक कार आणि दुसऱ्या हाताला युद्धासाठी लागणारी हत्त्यारे बनवण्याच्या खुबी मुळेच ही कंपनी युद्धा दरम्यानच्या अर्थसंकटात तग धरु शकली.दुसरं महायुद्ध संपताच १९४६ ला कंपनीने चार सिलेंडरवाली २६० D इंजिनाची कार १७० vमॉडेल लॉंच केलं. आणि या गाडीमुळं मर्सेडीज् बेंझचा जगभरता दबदबा निर्माण झाला.

 

पुढच्या बाजूला इंजिन असणारी पहिली गाडीचा

लक्झरी गाड्या बनवणाऱ्या या कंपनीने नंतर सर्वात वेगवान कार बनवण्याचा निर्धार केला. याआधी सर्वच गाड्यांची इंजनही मागच्या  बाजूला असायची पण वेगवान कार बनवण्यासाठी पुढच्या बाजूला इंजिन बसवण्यात आलं.

सर्वात वेगवान कार बनवण्याच स्वप्न साकार करत जगातली पहिली ३६ हॉर्सपॉवरची रेस कार मर्सेडीज् बेंझ ने तयार केली. रेसिंगच्या दुनियेत मर्सेडीज् बेंझने असं पाऊल ठेवलं.

 

मर्सेडीज् चा लोगो काय सांगतो

वर्तूळाकारात ताऱ्याचं चिन्ह असणारा मर्सेडीज् चा लोगो १९१० ला बनवण्यात आला. हा लोगो जल, जमिन आणि आकाशावर अधिराज्य गाजवणाऱ्या मर्सेडीज्- बेंझच्या इंजिनाचा इतिहास सांगतो.

अशी आली भारतात मर्सेडीज्

पुण्यातील चाकणमध्ये १९९४ ला मर्सेडीज्- बेंझचा प्लांट सुरु झाला आणि भारतात या कंपनीच्या कार बनायला सुरुवात झाली.  आणि १९९५ ला Mercedes-Benz W124 ही कार लॉंच झाली.

तर २००२ ला Mercedes-Benz W124 हे दुसरं मॉडेल लॉंच झालं. सिनेमाच्या अभिनेत्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंतचं क्लास स्टेटमेंट ठरलेली गाडी आज ही श्रीमंतीचं प्रतीक मानली जाते.

434 comments

Comments are closed.