बापाच्या कर्तृत्वाची माती करणारा पूत सुरेश राम

 

भागः 1

भारताचे पहिले दलित संरक्षण मंत्री जगजीवन राम व जनता सरकारचा सुपडा साफ

राजकारण्यांच्या रंगबाज पोरांनी आपल्या सज्जन माय-बापांचं पोलिटिकल करियरं बर्बाद केल्याची बरीच उदाहरणं आहेत. तसे राजकारणी धुतल्या तांदळासारखे साफ नाहीत, जगजाहीर आहेत. पण आपल्या छंदाफंदाच्या गोष्टी व्यवस्थित दाबून ठेवायची क्षमता त्यावर जास्त बोललं जात नाही. राजकीय- प्रशासकीय ताकदीच्या बळावर अशा गोष्टी दडपल्या जातात. काळाच्या ओघात आणि माणसांच्या अल्पस्मृतीने त्या वेगाने विस्मृतीतही जातात. या सीरीज मधून आपण त्यातले काही किस्से पाहणार आहोतच. अशा राजकीय खेळींचा बकरा बनवलेल्या काहींत भारतातलं पहिलं मोठं उदाहरण म्हणजे बाबू जगजीवन राम! 

भारताचे पहिले भावी दलित पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.  आणीबाणीनंतर 1977साली आलेल्या जनता दलाच्या मोरारजी देसाई सरकारमध्ये ते उपपंतप्रधान व जनता दल व कॉंग्रेसच्या दोन टर्म्समध्ये केंद्रीय सुरक्षामंत्री होते. अशा जगजीवन राम यांच्या राजकीय जीवनला बर्बाद करून टाकणारं षडयंत्र त्यांचा मुलगा सुरेश राम याच्या सेक्स स्कॅन्डलमधून घडवून आणलं. 

 

त्यांचा मुलगा सुरेश राम याचे त्याच्या मैत्रिणीसोबतच्या संबंधाचे फोटो 1978 साली मनेका गांधीच्या ‘सूर्या’ नावाच्या मॅगझीनमध्ये छापून आले. त्या मॅगझीनचे सल्लागार संपादक होते प्रसिद्ध पत्रकार व लेखक खुशवंत सिंग!

 

मूळ किस्सा आपण पाहू

आणीबाणीनं इंदिरा गांधीचा करिष्मा झपाट्यानं ओसरला होता. आणीबाणीपूर्वीच्या कॉंग्रेस सरकारमध्ये (1970 ते 1974) ते केंद्रीय सुरक्षा मंत्री होते. एककल्ली झालेल्या इंदिरा गांधीवर नाराज असलेले अनेक एकनिष्ठ कॉग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यातलं मोठं नाव जगजीवन राम यांचं. त्यांचे राजकीय काम इतके खणखणीत होते की ते जनता सरकारमध्ये पंतप्रधान होणार यावर पैजा लागल्या होत्या. मात्र अंतर्गत घडामोडींमुळे मोरारजी देसाई पंतप्रधान व उपपंतप्रधान असलेल्या जनता सरकारची स्थापना झाली. तरीही भावी पंतप्रधान म्हणून जगजीवन राम यांचाच दावा प्रबळ माला जात होता. पण त्यांचा रंगेल दिवटा सुरेश राम (किंवा सुरेश कुमार) याच्या लैंगीक कर्तबगारीनं त्यावर कायमचा बोळा फिरवला गेला.

 

स्वतंत्र भारतातील या पहिल्या तथाकथीत स्टिंग ऑपरेशनच्या बाबतीत खुशवंत सिंग यांनी खुलासा केला होता.

 

ते त्याकाळातील प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्र ‘नॅशनल हेरॉल्ड’चे संपादक होते. दैनिक आर्थिक डबघाईकडे जात होते. कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचीही परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत मनेका गांधी यांची आई अमतेश्वर आनंद त्यांना भेटायला आली. त्यांनी खुशवंत सिंग यांना मनेका गांधी ‘सूर्या’ नावाचं मासिक सुरू करीत असल्याचं व त्यासाठी खुशवंत सिंग यांची मदत मागितली. खुशवंत सिंग सूर्या मासिकाचे सल्लागार सांपादक झाले.

खुशवंत सिंग यांच्या माहीतीप्रमाणे, ते 1978च्या एकेदिवशी सकाळी हेरॉल्डच्या ऑफिसला आले असता त्यांच्या नावे एक पार्सल आले. त्यांनी ते पार्सल उघडताच त्यात त्यांना हे पोर्नोग्राफीक फोटो दिसले. त्याफोटोतल्या पुरुषाला त्यांनी तत्काळ ओळखले. जनता सरकारचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री जगजीवन राम यांचा कारनामे बहाद्दर पोरगा सुरेश राम! खुशवंत सिंग सांगतात, “कामसूत्रातल्या चौसष्ठ आसनातले साक्षात दहा आसनं त्या फोटोंत होती!”

 

त्या फोटोंतली युवती सुरेश रामपेक्षा तब्बल 10 वर्षांनी लहान होती. उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातल्या कुठल्याशा गावातून आलेली ही एकवीस वर्षीय युवती दिल्लीच्या सत्यवती कॉलेजमधे पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेत होती.

 

त्या फोटोंनी देशाच्या राजकारणात वादळ आणलं. त्या वादळाच्या तडाख्यात जनता सरकार आणि जगजीवन राम यांची राजकीय पुण्याई कस्पटासारखी उडून गेली. जगजीवन राम यांनी झालेलं नुकसान भरून काढण्याचा खूप प्रयत्न केले पण ते निष्फळ ठरले. त्यातला एक प्रयत्न म्हणजे सुरेश रामचे लग्न त्या फोटोतील युवतीबरोबर लावूनही देण्यात आले. मात्र झालेली नाचक्की काही मिटली नाही. तिच्याबद्दलचा रोष कधी मिटला जाणार नव्हता सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ होते. सुरेश रामच्या मृत्यूनंतर या कथीत सुनेला घराबाहेर काढण्यात आलं.

स्वातंत्र्य सैनिक व समर्पित गांधीवागी राजकारणी जगजीवन राम

पंडीत नेहरूंच्या नेतृत्वाखाली 1996ला स्थापन झालेल्या पहिल्या लोकसभेत श्रममंत्री म्हणून जगजीवन राम यांची राकीय कार्कीर्द सूरू झाली. त्या आधी कलकत्यातून 1934-35च्या सुमारास त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली होती. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाटी मोर्च त्याचप्रमाणे 34च्या बिहारच्या दुष्काळात त्यांनी केलेलं काम राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याजोगे होते. त्याचमुळे महात्मा गांधींच्या सान्निध्यात येताच गांधीवादानं ते भारून गेले. दलितांचा उद्धारक म्हणून महात्मा गांधींचा मार्ग त्यांनी अनुसरला. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांना कारावासही झाला. पुढे स्वतंत्र भारतात श्र ममंत्री, रेल्वे मंत्री, परिवहन संचार मंत्री, कृषी मंत्री व पुढे इंदिरा गांधींच्या मंत्री मंडळात संरक्षण मंत्री अशी पदे त्यांना सोपवण्यात आली. भारतातील हरीत क्रांतीच्या प्रणेत्यांत त्यांची गणणा होते. अशा समर्पित नेता पुढे या राजकीय घोडाबाजाराचा व षडयंत्राचा बळी ठरला. 

त्याचमुळे सुरेश राम सेक्स स्कॅन्डल भारतातील राजकारण्याच्या बदलत्या हिडीस वाऱ्याची दिशा स्पष्ट करणारं ठरतं. 

(या सेक्स स्कॅन्डलचे गाजलेले वाद-प्रतिवाद आपण थोड्या तशीलानं पुढील भागात वाचू शकाल.)

3,852 comments