भाजीपाल्याच्या किंमती दुप्पट पण शेतकऱ्यांचे हात रिकामेचं का ?

 

गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याची दुप्पट किंमतीने बाजारात विक्री सुरु आहे. त्यामुळं सामान्यांच्या खिशाला घरघर लागलीये तर ज्याने या भाजीपाला पिकवला त्याच्याकडून कवडीमोलानं भाजीपाल्याची खरेदी सुरु आहे.

भाजीपाल्यांची किंमत  दुप्पट का झालीये हे आपण पाहणार आहोत.

वेजीटेबल ग्रोवर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही देशभरातील भाजीपाल्याचे उत्पादन शेतकऱ्यांची या संघटनेनूसार या वर्षी भाजीपाला उत्पादनात घट व्हायचं कारण फक्त पाऊस नाहीये.

अवकाळी पावसामुळं नवे रोग, वातावरणातील बदल, टोळी किटकांचा हल्ला. महाराष्ट्रात पिकाला झालेला लाल किडीचा प्रादुर्भाव ही  कारणं आहेत

 

तर दुसरं प्रमुख कारण म्हणजे

लॉकडाऊन काळात भांडवल नसलेल्या शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान. पुढचं पिक घेण्यासाठी लागणाऱ्या पेरणी, बियाणं अन् लागवडी इतकाही पैसा शेतकऱ्याच्या हातात राहिला नसल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना भाजीपाला व्यापाऱ्याला विकून टाकला.

देशभरात टॉमेटो सरासरी ३८ ते ४० रु किलो. भोपळी २० रु किलो. वांगी १० ते १५ रुपये किलो अशा दरात भाजीपाल्याची विक्री सुरु आहे.

या कोरोनाकाळात हतबल शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करुन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून द्यावा अशी मागणी विविध शेतकरी संघटना करत आहेत.