समाजवादाच्या पायावर घराण्याची इमारत उभारणाऱ्या मुलायमसिंहाची कहाणी

दिल्लीचं सिंहासन मिळवायचं असेल तर उत्तर प्रदेश ताब्यात घ्यायलाच लागत, हे समीकरण आपण जाणतो. भारताच्या १४ पैकी पंतप्रधानांची निवड ही गोष्ट अधोरेखित करते.  ८० लोकसभा सीट्स असणाऱ्या या राज्याचा केंद्रीय राजकारणतला हस्तक्षेप लपलेला नाही.

अशा उत्तरप्रदेशमध्ये स्वतःचा आणि यादव कुटुंबाचा जलवा कायम करणाऱ्या मुलायमसिंहांची ही काहणी…

समाजवादी पार्टीचे  संस्थापक आणि तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या मुलायमसिंह यांना भारतीय राजकारण्यात त्या नेत्यांपैकी ज्यांचे डावपेच कधीही भारतीय राजकराणाची दिशा बदलू शकतात.  ८० वर्षाचे मुलायमसिंह गेल्या ५३ वर्षापासून सक्रीय राजकारणात आहेत. ४ ऑक्टोंबर १९९२ ला त्यांनी स्थापन केलेली समाजवादी पार्टी उत्तरप्रदेशच्या राजकारणातील प्रमुख पक्ष आहे.

सैफईमध्ये झाला जन्म

उत्तर प्रदेशच्या ईटावा जिल्ह्यातील मागास अशा सैफई नावाच्या छोट्या गावात आई मुर्तीदेवी व वडील सुघर सिंह यांच्या शेतकरी कुटुंबात मुलायमसिंहांचा जन्म २३ नोव्हेंबर १९३९मध्ये झाला. मुलायमसिंहांनी आग्रा कॉलेजमधून पॉलिटीकल सायन्समध्ये एमए करून काही वर्ष अध्यापनाचं काम केलं.

मुलायमसिंह यांच लग्न मालती देवी यांच्यांशी झालं. त्यांचं मे २००३ मध्ये निधन झालं. मालतीदेवींनी १९७३ ला अखिलेश यादव यांना जन्म दिला. मुलायमसिंहांच्या दुसऱ्या पत्नी साधन यादव यांना प्रतीक यादव नावाचा मुलगा आहे. ज्याचा जन्म १९८८ ला झाला. सर्वोच्च न्यायालयात एका केसवेळी मुलायमसिंहांना दुसऱ्या लग्नाची स्वीकार करावा लागला.

कुस्ती, समाजवाद आणि मुलायमसिंहाचा राजकीय प्रवास

कुस्ती आखाड्यात दंड ठोपटणारा मुलायम पुढ मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आसमान दाखवेल असं कोणालाही वाटलं नसेल. वयाच्या १५ व्या वर्षी समाजवादी विचारांनी प्रेरीत होवून १९५४ मध्ये उत्तर प्रदेशात शेतीसिंचनसाठी भरावी लागणारी रक्कम सरकारने वाढवली. त्यामुळे राम मनोहर लोहियांची प्रेरणा घेवून मुलायमसिंह ‘नहर रेट’ आंदोलनात सहभागी झाले. त्यात त्यांना तुरुंगावास झाला यात त्यांचा तत्कालीन दिग्गज नेत्यांशी त्यांचे संबंध प्रस्थापीत झाले. राजकारणाच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी मजूर, शेतकरी, विद्यार्थी, दलित व अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर आवाज उठवला.

त्या कुस्तीने मिळवून दिलं आमदारकीचं टिकीट

लहान वयातच लग्न झाल्याने मुलायमसिंहानी घरची जबाबदारी संभाळण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण होताच अध्यापनचे काम सुरू केले. यासोबतचं समाजवादी विचारांच्या प्रचारासाठी सायकलने कार्यकर्ते एकत्रीत करून गावोगावी सभा ही घेत होते, कधी कधी जंगी कुस्त्यांच्या स्पर्धेत ही भाग घ्यायचे. नयनपूरीच्या अशाच एका कुस्ती स्पर्धेत मुलामय सिंहानी स्वतःहून बलाढ्य पहिलवानाला आस्मान दाखवलं हा नजरा बघून जशवंतनगरचे तत्कलीन आमदार नथ्थुसिंह खुश झाले. बल आणि बुद्धी दोन्हीत संपन्न असणाऱ्या मुलायमसिंहांना नथ्थुसिंहांनी राजकीय शिष्य बनवलं आणि १९६७च्या विधानसभेच्या निवडणूकीत मुलायमसिंहांना नथ्थुसिंहांनी स्वतःच्या मतदार संघातची संयुक्त सोशालिस्ट पार्टीकडून आमदारकीचं टिकीट मिळालं.

कॉंग्रेसचे दिग्गज नेते अ‍ॅड लाखनसिंह यांचा पराभव करत मुलायमसिंहांनी विजय मिळवला. यानंतर मुलायमसिंह सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडूण आले.

१९७४ ला आणीबाणीचा विरोध केल्याने त्यांना १९ महिने तुरुंगवास ही भोगावा लागला.

अशी झाली यादव कुटुंबीयांची राजकारणात एन्ट्री

आणीबाणीनंतर कॉंग्रेसचा उत्तर प्रदेश आणि केंद्रात पराभव झाला. मुलायमसिंह सहकार मंत्री बनले आणि मुलायमसिंहांच्या राजकारणात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शिवपाल सिंहांना इटावा सहकारी बँकेचं अध्यक्ष बनवलं.  चुलत भाऊ रामगोपाल यादवांना इटावाच्या बसेहर जिल्हा परिषदेवर निवडणून आणून अध्यक्ष बनवलं.

राम गोपाल यादव हे महाविद्यालयात फिजीक्स शिकवायचे. कुटुंबातील सर्वात सुशिक्षीत सदस्य असल्याने मुलायमसिंहांच्या राजकीय व्युवहरचना बनवण्याचं  काम करत असतं तर शिवपाल यादवांकडे मुलायमसिंहांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यतातून वाचवण्याची जबाबदारी होती.

गोळीबाराच्या हल्ल्यात असे वाचले होते मुलामय सिंह यादव

१९८२ मध्ये युपीत व्हीपी सिंहाचं सरकार होतं. चंबळच्या डाकूंची व्हीपी सिंह पाठराखण करत असल्याचे आरोप मुलायम करत होते. चंबळच्या डाकुंची दहशत लक्षात घेता मुलायमसिंहांना याचा त्रास होणार हे निश्चित होतं, त्यामुळे मुलायमसिंहाचे राजकीय गुरू चरणसिंह यांनी मुलायमसिंहाना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते बनवत सरकारी सुरक्षा मिळवून दिली.  १९८४ ला इटावाच्या दौऱ्यावर असताना मुलायमसिंहांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता. तब्बल नऊ गोळ्या मुलामयम सिंहांच्या गाडीवर झाडल्या, पोलीस आणि हल्लेखोरांच्यात सुमारे अर्धातास चकमक सुरू होती यात मुलायमसिंहा सोबत असणारे सहकारी छोटेलाल आणि पोलीस कर्मचारी नेत्रपाल गंभीर जखमी झाले होते.

या हल्ल्यामागे कोणाचा हात होता याप्रश्नावर मुलायमसिंहानी उत्तर दिलं नाही. मात्र त्यांच्या पक्ष कार्यकर्ते या हल्ल्यामागे कॉंग्रेस (आय) च्या नेत्यांचा हात असल्याचे आरोप करत राहीले.

 

मुख्यमंत्री मुलायमसिंह

सक्रीय राजकारणात उतल्यानंतर तब्बल २२ वर्षांनी मुलायमसिंह देशाच्या सर्वात मोठ्या राज्याचे, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. पण हा मार्ग ही सुखकर नव्हता. राजीव गांधींचा पराभव करत व्हीपी सिंह प्रधानमंत्री बनले त्यांची इच्छा होती की चरणसिंहाचे पुत्र अजितसिंह यांनी युपीच मुख्यमंत्री बनाव, चरणसिंहाचा राजकीय वारसा अजितसिंहांना असला तरी जनाधाराचा वारसा मुलायमसिंहांना मिळाला होता आणि म्हणून जनता दलाने युपीत मुलायमसिंहांना मुख्यमंत्री बनवलं.

राजकारणात रमलेले मुलायमसिंहांचा अधिकचा वेळ लखनऊमध्ये जात त्यामुळे त्यांच्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी त्यांचे बंधू शिवपाल यादव यांचाकडे होती. वंशवादाच्या विरोधात भूमिका घेत लोहिया आंदोलनाशी जोडले गेलेले मुलायमसिंह स्वतःच युपीत घराणेशाहीचा पाया जाणत्या अजाणत्यापणे मजबूत करत होते.  

समाजवादी पार्टीचा जन्म

चंद्र शेखरांच्या जनता दलाच्या ताकदीवर मुख्यमंत्री बनलेल्या मुलायम सिंहांसमोर सर्वात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला तो  म्हणजे १९९० मध्ये आयोद्ध्येत बाबरी मशिदीचा विध्वंस करणासाठी एकत्र जमलेल्या कारसेवकांवर झालेल्या गोळीबारामुळं. त्यात त्यांना प्रचंड टीकेला सामोर जावं लागलं. मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागल. स्वतःच्या विचारांचा स्वतःचा पक्ष असावा या विचारानी त्यांनी समाजवादी पार्टीची निर्मीती केली. पण तेव्हा मुलायमसिंहांच्या पार्टीकडे जनाधार नव्हता. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर मात्र त्यांचा हा विचार योग्य ठरला बहूजन समाजवादी पार्टी सोबत आघाडी करत लढलेल्या १९९३ च्या निवडणूकीत २५६ पैकी १०९ जागांवर सपा तर १६४ पैकी ६७ जागांवर बसप निवडून आली. आणि कॉंग्रेसच्या समर्थनावर सरकार बनवतं मुलायम सिंह मुख्यमंत्री झाले पण हे सरकार जास्त काळ टिकलं नाही अवघ्या दोनच वर्षात १९९५ ला बसपने समर्थ परत घेतल्याने मुलायम सिंहाना राजीनामा द्यावा लागला.

 

केंद्राच्या राजकारणात मुलायमसिंह

युपीत सरकार पडल्याने मुलायम सिंहांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश केला. १९९६ मध्ये मैनपुरी लोकसभा मतदार संघातून निवडणू आले. केंद्राय युपीएची सरकार बनली तेव्हा ते रक्षामंत्री  होते. हे सरकार ही जास्त दिवस टिकलं नाही.

२००३मध्ये मुलायमसिंह पुन्हा युपीत परतले आणि २००७ पर्यंत मुख्यमंत्री होते. २०१२ ला युपीत सपाची सत्ता आल्यानतंर त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांना युपीच्या गादीवर बसवलं.

यानंतर २०१४ लोकसभा निवडणूकीत ते मैनपूरी आणि आजमगढ दोन्ही  मतदारसंघातून निवडून आले. मैनपूरी मतदार संघातून त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांचे नातू तेजप्रताप सिंह या मतदार संघातून पुन्हा निवडणून आले.  

 

यादव घराण्यातली यादवी

मुलायमसिंहांच्या सुरुवातीच्या राजकारणात शिवपाल यादवांच मोठे योगदान होत. अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टीत वाढता दबदबा आणि पक्षात अखिलेश यादावांची एकाधिकारशाही याला विरोध करत शिवपाल यादवांनी वेगळी चुल मांडली. यामुळे २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत अखिलेश यादवांना सत्तेवर पाणी सोडावे लागले.

शिवपाल यादवांनी प्रगतीशील समाजवादी पार्टीची स्थापना केली २०१९ च्या लोकसभा निवडणूक ही लढवली पण  जनाधार मिळवता आला नाही.

लोहियांच्या विचारांनी प्रेरीत होवून घराणेशाही विरुद्ध दंड थोपटणाऱ्या मुलायमसिंहांनी युपीत यदुवंशाचा पाया रचला. अनेक वादळांना तोंड देत मुलायमसिंह उभे आहेत. येत्या काळात कौटुंबीक आणि राजकीय पेचप्रसंगातून कसा मार्ग काढतात. हा येणारा काळच ठरवेल.

 

1,827 comments