सिंधीया घराणं कसं बनलं राजकारणातलं पावरहाऊस ?

 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजेशाही संपुष्टात आली. यात अनेक संस्थानिकांचं वैभव गेलं पण काही घराणी निवडणूकीच्या राजकारणात अन सत्ताकारणात आजही आपला दबदबा ठेऊन आहेत. सिंधीया घराण्याशिवाय उत्तर भारतातील राजकारण समजून घेता येणार नाही. 

इंदिरा गांधींना रायबरेलीत आव्हान देणाऱ्य़ा विजयाराजे असू देत की, राजीव गांधींनंतर पंतप्रधानाच्या शर्यतीत असणारे कॉंग्रेसचे माधवराव सिंधीया असू द्या. किंवा आत्ता राजकीय भूंपक करत मध्यप्रदेशात भाजपा जाणारे ज्योतिरादित्य असू द्या, अशा ताकदवान कुटुंबाचा राजकीय प्रवास मोठा रंजक आहे. 


शिवकाळानंतर अठरावे दत्ताजी शिंदेंकडे मालवा प्रांताचा कारभार होता. त्यांची राजधानी म्हणजे आत्ताची मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर.. पुढं शिंदे घराणं हिंदी भाषिक भागात स्थिरावल्यानंतर हळूहळू शिंदे या शब्दाचा अपभृंश झाला. आता शिंदे घराणं सिंधिया या नावानं ओळखलं जाऊ लागलं.

 
स्वातंत्र्यानंतर भारतात दुसऱ्यांदा १९५७ ला लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या. जुन्या ग्वाल्हेर संस्थानामध्ये लोकसभेच्या ८ तर विधानसभेच्या ६० जागांचा समावेश होता. जिवाजीराव सिंधीया कॉंग्रेस विचारधारेच्या विरोधात होते. जीवाजीराव सिंधीया हिंदू महासभेत सामील होतील आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या साऱ्या जागांवर पाणी सोडावं लागेल याची कॉंग्रेसला भीती होती.

कॉंग्रेसने दिलेली त्या ऑफरला विजयाराजे सिंधीया नाही देवू शकल्या नकार

जीवाजीराव सिंधीयांची निवडणूक न लढवण्याची इच्छा आणि वाढता कॉंग्रेसचा दबाव यामुळं त्रस्त झालेल्या जीवाजीराव शिंदेच्या पत्नी विजयाराजे सिंधीयांनी नेहरुंची भेट घेतली. नेहरुंनी विजयाराजे सिंधीयांना ग्वाल्हेर संस्थानचा हिस्सा असलेल्या गुना लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. सिंधीया राजघराण्याची राजकारणात एन्ट्री झाली. १९५७ ला गुना व १९६२ ला ग्वाल्हेरमधून विजयाराजे सिंधीया मोठ्या मताधिक्क्याने निवडूण आल्या.

त्या गोळीबाराच्या घटनेमुळं कॉंग्रेस सोडण्याचा घेतला निर्णय

मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री डी.पी. मिश्र यांनी ग्वाल्हेरमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात दोघांचा बळी गेला यामुळे राजेंनी १९६६ ला कॉंग्रेसपासून फारकत घेतली. १९६७ च्या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूका लढुन त्या विजयी झाल्या. सिंधीया कुटुंबाची दुसरी पिढी, राजकुमार माधवाराव सिंधीया आणि राजकुमारी वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषाराजे या निवडणूकीत प्रचारासाठी मैदानात उतरली.

महाराणी विजयाराजेंना १९ महिने तिहाड तरुंगात रहावं लागलं

इंदिरा गांधीनी १९७५ ला आणीबाणी जाहीर केल्यानंतर विरोधकांची धरपकड सुरु झाली. विजयाराजे सिंधीयांची रवानगी तिहाड तुरुंगात करण्यात आली तर इंदिरांचा पंजामाधवरांच्या पर्यंत पोहचण्याआधी माधवराव निसटले. विजयाराजेंची सुटकेसाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शर्थ माधवरावांनी मान्य केल्यानंतर. विजयाराजेंची  १९ महिन्यांनंतर सुटका करण्यात आली. अखेर माधवरावांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तर जनसंघात फुट पडून बनलेल्या भाजपात विजयाराजे राहिल्या.१९८५ च्या लोकसभा निवडणूकीत इंदिरा गांधीना विजयाराजेंनी रायबरेली मतदारसंघात आव्हान दिले तर अटल बिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमध्ये माधवराव सिंधींया विरोधात उभे होते. माधवराव २ लाखांच्या मताधिक्याने निवडणून आले तर विजयराजेंचा पराभव झाला. पण हा पराभव राजकीय आणि कौटुंबीक दोन्ही पातळीवर होता. माधवराव आणि विजयाराजेंच्यात जी दरी पडली ती कायमस्वरुपी राहिली.

 २००१ सिंधीया कुटुंबासाठी ठरलं वाईट वर्ष

२५ जानेवारी २००१ ला विजयाराजेंनी जगाचा निरोप घेतला. आईच्या अंत्यविधीनंतर माधवरावांना दुसरा मोठा झटका बसला. सिंधीयांच्या अरबोंच्या मालमत्तेतून विजयाराजेंनी पुत्र माधवराव आणि नातू ज्योतिरादित्यांना बेदखल केलं होतं. २००२ मध्ये उत्तरप्रदेश विधानसभेच्या प्रचारासाठी निघालेल्या माधवरावांची विमान दुर्घटेनत मृत्यू झाला. राजकारणाच्या आसमंतातील सिंधीया वंशाचा सर्वात तेजस्वी तारा निखळला.

ज्योतिरादित्य सिंधीयांवर आली जबाबदारी

माधवराव केंद्रीय राजकारणात ध्रुवताऱ्यासारखे चमकु लागले. राजीव गांधीच्या कॅबिनेटमध्ये रेल्वेमंत्री तर पी.व्ही. नरसिंह रावांच्या कॅबिनेटमध्ये सिविल एव्हिएशन मंत्री राहिलेल्या सिंधीयांचे कॉंग्रेसमध्ये वाढती ताकद पाहता आगमी पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव चर्चेले जावू लागले.  विमान दुर्घटनेत माधवरावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योतिरादित्य सिंधीयांवर सिंधीया राजकारणाची जबाबदारी आली. गुना लोकसभेच्या पोट निवडणूकीत ४ लाखांच्या प्रचंड मताधिक्याने ज्योतिरादित्य सिंधीया निवडून आले. २००२ पासून ते गुना लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसला विजयी करत राहिले आहेत. राहूल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधीयांना मनमोहन कॅबिनेटमध्ये उर्जामंत्री बनवण्यात आले होते.सलग १५ वर्ष सत्तेवर असणाऱ्या शिवराजसिंह चौहान सरकारचा सुफडा साफ करत २०१९ ला स्पष्ट बहुमाताने मध्यप्रदेश विधानसभा काबीज करण्यात त्यांची प्रमुख भुमिका राहिली. पण मुख्यमंत्री पदाची आशा असलेल्या ज्योतिरादित्यांना नाराज करत कॉंग्रेसने कमलनाथानांना मुख्यमंत्री केलं.या नाराजीचा वचपा काढत ज्योतिरादित्यांनी बहुमताने निवडुन आलेल्या कमलनाथ सरकारला सुरुंग लावला. मध्यप्रदेशमध्ये ऑपरेशन लोटस राबवत त्यांनी शिवराज सिंहांना पुन्हा मध्यप्रदेशच्या गादीवर बसवलं.

महाराणीचा वारसा पुढं चालवणाऱ्या राजकन्या

विजयाराजेंनी त्यांची दोन्ही कन्या वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे दोघींनी  राजकारणाचे धडे गिरवायला लावले. राजस्थानच्या धौलपूर राजघराण्यात वसुंधराराजेंचा विवाह झाला.भाजपात राहून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु ठेवलं. २००३ च्या राजस्थान विधानसभा निवडणूकीत त्यांनी अभूतपुर्व यश संपादन करत २०० पैकी १२० जागा जिकून वसुंधरा राजे सिंधीया राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या.

२०१३ च्या विधानसभेत वसुंधरा राजेंनी मोठ यश मिळवलं. २०१८ च्या विधानसभा निवडणूकीत वसुंधराराजेंना राजस्थान गमवावं लगालं.सचिन पायलट यांनी बंडखोरी करत राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी वसुंधरा काम करत असल्याच्याही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.विजयाराजे सिंधीयांच्या कन्या यशोधरा राजे १९९८ पासून आमदार आहेत. शिवराज सिंहाच्या कॅबिनेटमध्ये त्या उद्योगमंत्री ही होत्या.

विजयाराजे, माधवराव सिंधीया, वसुंधरा राजे, ज्योतिरादित्य सिंधीया आणि यशोधरा राजे सिंधीया अशा चार पाच पिढ्यांनी उत्तर भारतातील राजकारणावर आपला दबदबा कायम ठेवला. 

 

825 comments

Comments are closed.