अमेरिकेचा तो उद्योजक ज्याच्या लिखानातून हिटलरने घेतली होती प्रेरणा.

 

अडॉल्फ हिटलर  सैन्यदलातील साधारण शिपाई ते जर्मनीचा राष्ट्रध्यक्ष बनलेला असा महत्त्वकांक्षी व्यक्ती ज्याने पुन्हा कंबर कसली होती संपूर्ण जगावर विजय मिळवायची. दुसरं महायुद्ध सुरु होण्याचं आणि संपण्याच कारण बनलेल्या हिटलरने सबंध जगाला युद्धभूमित बदललं. आणि हाच हिटलर अमेरिकेच्या एका उद्योजकाकडून प्रेरित झाला होता. हेनरी फोर्ड… अधुनिक कार व्यवसायकाचा जनक.

 

नखानं मित्रांचे घड्याळं दुरुस्त करणाऱ्या फोर्ड यांनी कौशल्याच्या जोरावर जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांच्या यादीत स्थान मिळवलं. त्यांनी शेती करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती मात्र. फोर्ड यांना आसमंत कवेत घ्यायचा होता.

 

एडिसनच्या कंपनीत होते इंजिनिअर

 

फोर्ड यांनी १८९१ मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांच्या कंपनीत अभियंता म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि १८९६ मध्ये त्यांनी पहिली चार चाकी कार तयार केली. बल्बचा शोध लावणाऱ्या एडिसन यांनी फोर्ड यांना या कामात मोठी मदत ही केली.

नंतरच्या काळात काही पैशांची जमवाजमव करुन फोर्ड यांनी ऑटोमोबाईल क्षेत्राचं नशीब कायमस्वरुपी बदललं तो दिवस होता. १६  जून १९०३ फोर्ड कंपनीच्या स्थापनेचा. या दिवसानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रचंड मेहनत आणि व्यवसायातील सटीक नियोजनामुळं थोड्याच कालावधीत फोर्ड जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या पंगतीत जावून बसले.

 

फोर्ड यांच पुस्तक नाझी जर्मनीसाठी बायबल ठरलं

 

व्यवसायात चढउतार हे आलेच. शिखर स्थानावर असलेल्या फोर्ड यांना ही याचा सामना करावा लागला. १९२७ पर्यंत जगभरातली बाजारात फोर्डला प्रतिस्पर्ध्यांमुळ मोठं नुकसान झालं. फोर्ड निराशेच्या गर्तेत सापडत गेले. त्यांच्यात नकारात्मकता आणि द्वेष भावना वाढीस लागली.

 

अमेरिकेचे महान राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या एका ज्यू व्यक्तीने केल्याचे त्यांनी कुठं तरी ऐकलं आणि आता ही गोष्ट सिद्ध करण्याचा निश्चय त्यांनी केला.

 

हळूहळू ज्यू धर्मियांबाबत त्यांच्या मतांनी घृणेच रुप घेतलं. आणि हाच तो रस्ता होता ज्यावर हिटलशी त्यांची भेट होणार होती.  १९१९ ते १९२७ च्या एका वर्तमानपत्रातील लेखांच्या माध्यमातून हेनरी फोर्ड यांनी ज्यू धर्मियांविरोधात भडास काढायला सुरुवात केली. ज्यू धर्मियांनी अमेरिकेच्या महान संस्कृतीचा नाश केला असं त्यांच मत होतं.

पुढं या सर्व लेखांना पुस्तकाचं रुप देण्यात आलं ज्याच नाव होतं द इंटरनॅशल ज्यू :  द वर्ल्ड्स फॉरमोस्ट प्रॉब्लम.हिटरलच्या नाझी जर्मनीतील सर्वाधिक खपाचं हे पुस्तक बनलं.

स्वतःला शांतीदूत मानणाऱ्या फोर्ड यांनी घेतलेल्या या भूमिकेविरुद्ध अमेरिकेतील विचारवंत व टिकाकारांनी त्यांची निंदा सरु केली पण ज्यू लोकांचा विरोध करणारे फोर्ड हिटलरसाचे सर्वात प्रिय अमेरिकन व्यक्ती होते. ज्यांच्यामुळे हिटरला ज्यू विरोधी नाझी विचारधारेसाठी लागणारी वैचारिक सामग्री पुरवली. अशी नोंद हिटलरने माइन काम्फया आत्मचरित्रात केली आहे.

 

फोर्ड यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हिटलरने केले होते सम्मानित

फोर्ड जेव्हा वर्तमानपत्रातून ज्यूंवर टीका करत होते तेव्हा दुरवर जर्मनी नावच्या देशात हिटलर संघर्ष करत होता. जगण्यासाठी. पुढे तो राजकारणाकडे वळला आणि संपूर्ण जर्मनीची सत्ता त्यानं हाता घेतली. नाझी विचारांनी त्याचं सिंहासन मजबूत केलं आणि या विचारा मागं प्रेरणा होती फोर्ड यांच्या विचारांची. आता हिटलर सर्वशक्तीशाली होता पण वेळ होती. गुरु दक्षिणेची.

हिटरलच्या नाझी विचारांचा पाया घालणाऱ्या फोर्ड यांच्या ७५ व्या वाढदिवशी जर्मनी बाहेरील नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार जर्मन ईगल्स गॉड क्रॉसहा पुरस्कार देवून १९३७ ला सम्मानितं केल.

फोर्ड यांच्यावर अनेकदा टीका झाली तर अनेकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. कामगारांना सुखसोई मिळाल्य तर ते गुणवत्ता पुर्ण काम करु शकतात याची जाणीव त्यांना होती त्यामुळे कामगारांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. इतर व्यवसायांपेक्षा फोर्ड कंपनीतील वेतन जास्त असायचे.

त्याचं स्वप्न अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यावसायिक बननं हे नव्हत तर. प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या घराबाहेर फोर्डची कार उभी असावी हे त्यांच स्वप्न होतं. गरीब कार खरेदी करु शकत नाहीत ही समाज धारणा त्यांनी बदलली. एका अर्थाने फोर्ड यांना

576 comments

Leave a Reply

Your email address will not be published.