सिलीकॉन व्हॅलीच्या संगणक उद्योगपंढरीचा ज्ञानदेव कोण होता जाणून घ्या?

 

सुखकर आयुष्यासाठी चांगली नोकरी आणि नोकरीसाठी शिक्षण गरजेचं आहे असं आपल्यावर लहानपणापासून  बिंबवण्यात येतं, पण माणसाचं आयुष्य खऱ्या अर्थानं सुखकर करणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडं पाहिलं तर कोणत्याना कोणत्या कॉलेज ड्रॉपआउटनं बनवलेल्याचं दिसून येतं.

थांबा थांबा तुम्ही कॉलेज सोडावं असं आमचं अजिबात म्हणणं नाही… पण कॉलेज म्हणजेच सगळ काही असतं असं काही नाही. सिलीकॉन व्हॅली नावाच्या महाकाय संगणक उद्योग पंढरीच्या ज्ञानदेवाची ही गोष्ट.

आजच्या काळात मोबाईलशिवाय एक क्षणही आपण राहू शकत नाही. गाणी ऐकणं असो, गेम खेळणं असो वा व्हिडीओ पाहणं. हे सगळ आपल्याला गिफ्ट म्हणून मिळालंय. ते गिफ्ट दिलंय चार्लस बॅबेज यांनी.

आधी कधीही नव्हतं इतक जग सोप्प झालंय ते केवळ बॅबेज यांच्यामुळं मग ते ऑटोमॅटीक कार असोत, मेट्रो असो. बँक असो वा पृथ्वी भोवती भिरभिरणारे असंख्य उपग्रह. सर्वांच नियमन आणि नियंत्रण संगणाकाद्वारे केलं जातं. त्या संगणकाच्या जनकानं आजच्याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. जाणून घेवूयात त्यांच्याबद्दल.

डिसेंबर १७९१ ला लंडनमध्ये बँकर कुटुंबात त्यांचा जन्म झालेल्या बॅबेज यांनी कँब्रीज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं. सबंध जगाला एका धाग्यात गुंफणाऱ्या डिजीटल प्रोग्रॅमिंगचा शोध त्यांनी लावला होता. शालेय जीवनापासून गणित विषयाची आवड आणि प्रचंड कुतूहल या गुणांमुळे त्यांच्यातल्या संशोकाचा प्रवास अधिक रोमांचकारी ठरला.

ऑक्सफर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर गणित विषयाबद्दलच्या प्रचंड आकर्षणाची त्यांना जाणीव झाली. १८१२ला त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. गणित विभागात ते नेहमी अव्वल येत. नव्या वैज्ञानिकांना एकत्र करुन त्यांनी अनेक विषयांवर संशोधन केलं. पण थिसीसबद्दलच्या वादामुळं त्यांना पदवी मिळाली नाही. १८१४ला परिक्षेशिवाय त्यांना पदवी मिळाली. ब्रिटनच्या जगप्रसिद्ध रॉयल इन्स्टीट्यूटमध्ये काही वेळ ते प्राध्यपक म्हणून विद्यादानाचं काम त्यांनी केलं. निसर्गासंबंधी केलेल्या विशेष अभ्यासासाठी त्यांना १८१६ला रॉयल फेलोशिपही मिळाली.

कसं ही कितीही अवघड गणित असलं तरी ते चुटकी सरशी सोडवायचं टॅलेन्ट होतं चार्ल्स बॅबेज या माणसाकडं.  १८१३ला त्यांनी अशा यंत्राची संकल्पना मांडली जे मोठ मोठे हिशेब काही सेकंदात करु शकेल तेही अगदी अचूक. आणि त्याची प्रतही काढू शकेल. त्या यंत्राला नाव देण्यात आलं होतं डीफर्न्स इंजीन. या शोधानं कॉम्यप्यूटर्स, मोबाईल, एआरसह आयटी क्रांतीला वाट मोकळी करुन दिली.

बॅबेज फक्त वैज्ञानिक नव्हते. ते उत्तम दर्जाचे वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ होते. विषयाची उत्तम जाण असणारे इंजिनिअर होते.  स्वभावाला शांत आणि मनमिळावू असणारा हा माणूस प्रचंड मेहनतीनं काम करायचा. कोणाचीही मदत न घेता त्यावेळी त्यांनी पहिलं कॉम्प्युटर बनवलं. कॉम्प्युटर म्हणजे काय तर एका प्रकारचं हिशेब यंत्र. म्हणजे तुम्ही नोटा मोजयला डोक्याच्या बाहेर जातायेत म्हणल्यावर जे आता वापरता ते कॅलक्यूलेटर / कॅल्सी. गणितीय संकल्पनांचा वापर करुन त्यांनी हे यंत्र बनवलं होतं.

ब्रिटीश शासनाकडून करण्यात आला गौरव

बॅबेज यांच्या संशोधनाचा पसारा दिवसेंदिवस वाढतंच होता. त्यावेळच्या ब्रिटीश गव्हमेंटनं त्यांना अनेक मोठ्या प्रकल्पात सामील करुन घ्यायला सुरुवात तर केलीच पण मिळणाऱ्या नफ्याचा मोठा मोबदला बॅबेज यांना देण्यास सुरुवात केली. मोठ्या आकडेमोडीच्या मशिन्स बनवण्यासाठी सरकारने त्यांना पैसा पुरवला. पण सुरुवातीच्या काळात सामान्य नागरिकांना ते यंत्र विकत घ्यायला परवडणारं नव्हतं. पण हार मानतील ते बॅबेज कसले त्यांनी संशोधनासाठी पुन्हा कंबर कसली आणि अत्यल्प किमतीत ही यंत्रं सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झाली. सहा आकड्यांपर्यंतची आकडे मोड करणं या यंत्रामुळं. दैनंदिन आयुष्यातील आकडेमोडी सोबतचं तपशीलवार हिशोबासाठी त्यांनी पुढं अनेक संशोधन केलं त्यायूनच विश्लेष्ण यंत्र म्हणजेच कॉम्प्यूटर जन्माला आलं.

दुःखातून असा काढला मार्ग

बॅबेज यांनी १८१४ ला जोर्जिया व्हाइटमोर यांच्या लग्न केलं त्यांना ८ आपत्तेही होती. त्यातली केवळ तिघेच जगू शकली.  १८२८सालानं मोठा घात केला. त्यांचे वडील, पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. या दुखातून त्यांनी स्वतःला सावरलंही, नंतर युरोपच्या प्रवासावर असातना त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला. या घटनेनं त्यांना आतून बदलंल. स्वतःला पूर्णवेळ कामात झोकून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

१८ ऑक्टोबर १८७१ला वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. जगातल्या सर्वात प्रतिभावंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या बॅबेज यांचा मेंदू लंडनच्या हंटेरियन म्यूजियमध्ये ठेवण्यात आलाय.

बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स ते सुंदर पिचाई सोबतचं आज सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणाऱ्या पोरांच्या हातात कॉम्प्यूटर आला तो याच बॅबेज नावाच्या माणसामुळं.