डाइनामाईटचा जनक ते विश्वाचा शांतीदूत! कोण आहे अल्फ्रेड नोबेल ?

जगभरात सर्वात मोठा पुरस्कार म्हणून ज्या पुरस्काराला ओळख आहे असा नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या प्रेरणेतून आणि संपत्तीतून दिला जातो.

अनेकवेळा ‘अल्फ्रेड नोबेल नक्की कोण?’ असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच. त्याचंच उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि हाताला जे लागलं ते सगळं समोर ठेवत आहोत.

अल्फ्रेडचं जीवन खतरनाक होतं. वयाच्या नवव्या तो सेंट पीटर्सबर्गला शिकत होता. नंतर तो पॅरिसला गेला. त्याच्याबद्दल विशेष गोष्ट अशी की वयाच्या १७ व्या वर्षी त्याला जगातल्या पाच भाषा बोलता येत होत्या.

केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यानंतर त्याने नायट्रोग्लिसरिनचा सुरक्षित उपयोग या विषयावर संशोधन सुरू केलं. त्याचे तीन भाऊ पीट्सबर्गला व्यवसाय करायचे. १९६३ मध्ये त्याला ब्लस्टिंग ऑइलचं पेटंट मिळालं आणि यातूनच पुढे डायनामाइट जन्माला आलं. नायट्रोग्लिसरिन व सिलिका एकत्र करून अल्फ्रेडने डायनामाइट तयार केले. यामुळे ते सिलिंडरमध्ये भरणंही सुलभ झालं. या शोधामुळे विस्फोटाची शक्ती वाढली. खाणकामात व मोठ्या प्रमाणावरील बांधकाम क्षेत्रात यामुळे क्रांती आली. डायनामाइटची मागणी प्रचंड वाढली. या साऱ्यामुळे अल्फ्रेडचं जगभर नाव गेलं आणि हीच त्याची ओळख झाली.

अल्फ्रेड हा फक्त वैज्ञानिक नव्हता तर एक उत्तम उद्योजकही होता. पण एखाद्या उद्योगात अडकून न पडता त्याने त्याचं संशोधन सुरूच ठेवलं. त्याने अनेक शोध लावले. डाइनामाईटच्या स्फोटान जीवित हानी होऊ नये म्हणून उपाय शोधण्यात तो सतत प्रयत्नशील होता.

अल्फ्रेड नोबेलच्या नावावर एकूण 350 पेटंट आहेत. सोबतच त्याने त्याच्या आयुष्यभरात 150 पुस्तकांचं लेखनही केलं आहे.

अल्फ्रेड नोबेल त्याच्या सततच्या अभ्यासात आणि संशोधनात व्यस्त असल्याने स्वत:च्या खासगी आयुष्यात मात्र त्याला फार लक्ष देता आलं नाही, त्यामुळेच त्याचं लग्नही होऊ शकलं नाही. पण खूप पैसा कमवूनही त्याच्या शेवटच्या काळात सोबत कुणही नसल्याने तो एकटा पडला होता. पण अशावेळी तो खचला नाही. त्याने जमवलेल्या संपत्तीतून त्याने एक ट्रस्ट सुरू केली. ट्रस्ट साथी निधी जमा केला, आणि जगात शांती यावी, जगाचा विकास व्हावा, या सद्भावनेतून नोबेल पुरस्काराचा जन्म झाला. अन् डाईनामाइटचा विध्वंसक शोध लावणारा अल्फ्रेड नोबेल, विश्वाचा शांतीदुत झाला.

अल्फ्रेड जीवंत असताना हे शक्य झालं नाही, पण 1901 पासून अल्फ्रेडच्या प्रेरणेतून आलेला नोबेल पुरस्कार वैश्विक शांतीसाठी काम करणार्‍यांना दिला जातो. ट्रस्टच्या जमा रकमेच्या व्याजातूनच हा पुरस्कार दिला जातो.