भले भले गुन्हेगार का घाबरतात अंडासेलला !

 

गुन्ह्यांच प्रमाण काय भारतात कमी नाही. छोट्या मोठ्या पाकीटमारीपासून  दरोडा, बलात्कारापर्यंत कितीतरी गुन्हे रोज भारतात घडतात. गुन्हेगार एवढे खतरनाक सराईत असतात की जेल मध्ये जाणं त्यांना काहीच विशेष वाटत नाही. पण एक जागा अशी आहे जिथे भल्याभल्यांना घाम फुटतो. अंडासेल ! अंडासेलचं नाव तुम्ही कधी न कधी, कुठे न कुठे ऐकलं असेलच. पण नक्की अंडासेल असतं तरी कसं हा प्रश्न तुम्हाला पडत असेलच !

 

अंडासेल नक्की कसा असतो हे पाहायाला आपण तिथे जाऊ शकत नसलो तरीही आपलं बॉलीवूड आपल्यासाठी लय मेहनत घेतं भावांनो.. आता अंडासेल बघायचं असेल तर सरळ सेक्रेड गेम्स सुरू करा. सेक्रेड गेम्स च्या पहिल्या सीझन मध्ये पारोलकर गायतोंडेला अटक करतो आणि त्यानंतर एका छोट्या खोलीत बंद करतो. तिथेच खाणं-पिणं आणि इतर कार्यक्रम उरकताना नावाजचा एक फेमस डायलॉग तुम्ही ऐकला असेल “मर जाएगा मै इधर” ही तीच जागा अंडासेल !

 

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आणि मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात अंडासेल आहेत. इथे दहा बाय दहाच्या अंडकुती खोल्या बांधण्यात आल्या आहेत.

 

अंडासेल हा तुरुंगवासातला खतरनाक भयानक प्रकार आहे. तिथं नक्की असतं काय, तर अंड्याच्या आकाराची एक छोटी  खोली असते. ज्या खोलीत प्रकाश यायला थोडीही जागा नसते. अंडासेल मध्ये राहणार्‍या गुन्हेगाराला त्या छोट्याश्या खोलीत 24 तास राहावं लागतं. एका छोट्याश्या खिडकीतून त्याला जेवण दिलं जातं. विचारही केला जाणार नाही अशाप्रकारच्या ह्या शिक्षेची कल्पनाही करणं अवघड जातं.

 

आजपर्यंत अनेक खतरनाक गुन्हेगारांना अंडासेल मध्ये ठेवण्यात आलं होतं.  2009 च्या मुंबई हल्ल्यातला गुन्हेगार अजमल कसाबला मुंबईच्या आर्थररोड कारागृहाच्या  अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याआधी अबु सालेम, अबु जिंदाल अशा अनेक कुख्यात गुन्हेगारांना ठेवण्यात आलं होतं.

 

1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी अवैधरित्या शस्त्र बाळगल्यामुळे संजय दत्तला अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय दत्तलाही अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.

 

अशा परिस्थितीत राहून गुन्हेगारांचं मानसिक खच्चीकरण होऊन पुन्हा असा गंभीर गुन्हा करण्याची हिम्मत होऊ नये यासाठी गुन्हेगारांना अंडा सेल मधन्ये ठेवलं जातं. गुन्हेगारांना मात्र अंडासेलचं नाव ऐकून चांगलाच घाम फुटतो हे नक्की!