चार्जशीट म्हणजे नक्की काय ?

 

आपल्या सगळ्यांनाच गुन्हेगारी जगातल्या गोष्टींबद्दल नेहमीच कुतूहल असतं. पोलिस कसं काम करतात ह्याविषयीचे पिक्चर आणि मालिका आपण पाहत असतो. वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो. या सगळ्यात नेहमी एक शब्द कानावर येतो, चार्जशीट !

 

पोलिस तपासाला सुरुवात होते एफआयआर पासून. एफ आय आर म्हणजे प्रथम माहिती अहवाल. गुन्ह्यासंदर्भात जी पहिली माहिती मिळते त्या माहितीची नोंद करून पोलिस तपास करायला सुरुवात करतात.

 

पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिस न्यायालयात तपासतील महत्वाचे मुद्दे आणि केस संदर्भातलं मत न्यायालयासमोर सादर करतात यालाच आरोपत्र म्हणतात. हे आरोपपत्र म्हणजेच चार्जशीट.

 

चार्जशीट मध्ये नक्की असतं तरी काय ?

  • घडलेल्या गुन्ह्याची सविस्तर माहिती
  • गुन्ह्याचं ठिकाण, गुन्ह्याच्या वेळेची माहिती
  • फिर्यादी आणि आरोपींची नावं
  • केस मधील साक्षीदारांची नावं
  • आरोपीच्या तपासची सविस्तर माहिती
  • आरोपीच्या जामीनाबद्दलची साविस्तर माहिती

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीबद्दल न्यायालय कागदपत्रांची तापसणी करून खटला पुढे चालवायचा की नाही याचा निर्णय घेतं.

 

पोलिसांना तपास करून प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्र चार्जशीट न्यायालयात सादर करावं लागतं परंतु  गुन्हे जर एका प्रकारात एकाच वर्षी घडलेल्या 3 गुन्ह्यांसाठी एकच चार्जशीट दाखल केलं जातं.

 

एखाद्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली असेल तर 60 ते 90 दिवसात त्याचं आरोपपत्र दाखल करणं गरजेचं असतं. आरोपपत्र दाखल झालं नाही तर आरोपीला जामीन मिळणं सोप्पं होतं.

 

आरोपी आणि फिर्यादी दोघांनाही प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. संविधानाच्या अनुच्छेद 21 नुसार प्रत्येकाला हा मूलभूत अधिकार मिळतो. या अधिकारामुळे दोषीला लवकरात लवकर शिक्षा व्हायला आणी निर्दोष व्यक्तीची सुटका व्हायला मदत होते.