मिसेस मुख्यमंत्र्यांचा पारंपरिक चेहरा बदलणार्‍या अमृता फडणवीस !

 

मुख्यमंत्री फडणविसांच्या सत्ताकाळापासून आजपर्यंत अमृता फडणवीस कोणत्या न कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असतात. आता त्यांच्या नव्या आलेल्या ‘तिला जगू द्या’ या गाण्यामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत. अनेक लोक त्यांना त्यांच्या कामासाठी ट्रोल करतानाही दिसतात, पण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख ही आपण लक्षात घ्यायला हवी.

आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री बघितले. पण कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या पत्नीने राजकारणात सक्रिय नसताना कुठलीही भुमिका घेऊन ठामपणे मतं मांडली नव्हती. मुख्यमंत्र्याची मॉडर्न असलेली पत्नी महाराष्ट्र पहिल्यांदा बघत असल्याने समजाच्या विविध स्तरावरून होणार्‍या टीकेलाही अमृता फडणविसांना सामोरं जावं लागलं. अमृता फडणविसांचा मुख्यमंत्री फडणविसांना एकेरी भाषेत उल्लेख करतनाचा एक व्हिडिओ खतरनाक व्हायरल झाला होता. त्यावरही अनेकांनी “मुख्यमंत्र्यांना एकेरी कशी हाक मारली” वगैरे टीका केली होती.

मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून विचार न करता अमृता फडणवीस एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत ह्या विचाराला देवेंद्र फडणविसांनीसुद्धा खूप वेळा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अमृता फडणविसांच्या स्वतंत्र व्यकीमत्वाचा विचार करत त्या नक्की कोण ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देतोय…

अमृता फडणवीस या मूळ नागपूरच्या आहेत. त्यांचे आईवडील दोघंही डॉक्टर आहेत. एम.बी.ए. पूर्ण केल्यानंतर त्यांनी अॅक्सिस बँकेत एक्झिक्युटीव्ह कॅशियर म्हणून नोकरी सुरू केली. पुढे त्यांचं देवेंद्र फडणविसांसोबत लग्न झालं. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्या मुंबईत आल्या. बॅंकिंगमध्ये काम करतच त्यांनी आपली गायनाची आवड जोपासायलाही सुरुवात केली. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ चित्रपटात गायलेलं गाणं प्रसिद्ध झालं होतं. अमिताभ बच्चन सोबतही त्यांनी एक अल्बम केला.

 

संगितातल्या त्यांच्या करियरवर अनेक प्रकारच्या टीकाही झाल्या. अमृता फडणवीस खरच कर्तृत्ववान आहेत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या पदरात संगीतातलं यश पडलं हा प्रश्न अनेक टिकाकर्त्यांनी उपस्थित केला.

 

सध्या अमृता फडणवीस अॅक्सिस बँकेत मोठ्या हुद्दयावर काम करतात. त्यांची बंकेतली कारकीर्दसूद्धा बरीच चर्चेत राहिली आहे. महाराष्ट्रातल्या पोलिस कर्मचार्‍यांची राष्ट्रीय बँकांमधली खाती अमृता फडणवीस मोठ्या पदावर असलेल्या अॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि अमृता फडणविसांवर झाला.

फडणविसांच्या सत्ताकाळात मुंबईतल्या नद्यांना वाचविण्यासाठी अमृता फडांविसानी केलेलं ‘रिव्हर सॉंग’ ही चर्चेत आलं होतं. या गाण्याच्या कॉंट्रॅक्टवरूनही विरोधात असलेल्या कॉंग्रेसने मुद्दा लावून धरला होता.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अमृता चर्चेत असल्या तरीही फक्त मुख्यमंत्र्याची बायको अशी कधीही त्यांची प्रतिमा नव्हती. त्या नेहमीच स्वतंत्रपणे त्यांची मतं मांडत आल्या आहेत. मुख्यमंत्र्याच्या बायकोने अमुक अमुक कपडे घातले पाहिजेत किंवा ‘असंच’ वागलं पाहिजे या परंपरागत वारस्यात अडकून न पडता त्यांनी हा उंबरठा ओलांडून स्वतंत्र नवी प्रतिमा तयार केली ही गोष्ट महाराष्ट्राने स्वागतार्ह मानायला हवी.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणविसांची ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा बरीच लोकप्रिय झाली होती. राज्यात खतरनाक सत्तानाट्य चालू असताना अमृता फणवीसांनी केलेलं ट्विट चांगलच व्हायरल झालं होतं. ट्विट मध्ये अमृता म्हणाल्या होत्या…

 

पलट के आऊंगी शाखों पे खुशबुएँ लेकर,

खिज़ां की ज़द में हूँ मौसम ज़रा बदलने दे

 

मौसम बदलणार की नाही हे आपल्याला काय माहीत नाही पण अमृतांनी असच कायम स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासत रहावं !