राजकारणासोबतच पत्रकारितेशी प्रामाणिक असलेल्या संजय राऊतांचा प्रवास कसा आहे ?

संजय राऊत काही दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टीसाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आधीही त्यांची एक अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेचा वेळ मात्र वेगळी होती. 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर एखाद्या बॉलीवूडच्या पिक्चरलाही लाजवेल असं चित्र होतं. 56 आमदार निवडून आलेल्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या मुद्द्यावर शिवसेना अडून बसली होती. शिवसेनेच्या सर्वच पक्षांसोबत बैठका होत होत्या. सामनातून संपादक संजय राऊत अग्रलेखावर अग्रलेख लिहून शिवसेनेची भूमिका मांडत होते. शिवसेनेची भूमिका मीडियापर्यंत आणि तिथून समान्य माणसापर्यंत पोहोचवणारेही संजय राऊतच होते. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. पण अशातच संजय राऊतांना हृदयाचा त्रास सुरू झाला. लीलावती रुग्णालयात अॅडमिट झालेल्या राऊतांच्या हृदयात दोन ब्लोकेज असल्याचं निदान झालं. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र दुसर्‍याच दिवशी सोशल मीडियात एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. तो फोटो होतं रुग्णालयातून  सामनासाठी अग्रलेख लिहिणार्‍या संजय राऊतांचा ! दवाखान्यातल्या कपड्यात, हातावर सलाईन असताना संजय राऊतांच्या त्या फोटोची प्रचंड चर्चा झाली. कमाप्रती एवढी निष्ठा असलेल्या संजय राऊतांच्या कामाची सुरुवात पत्रकारीतेपासूनच झाली होती त्यांच्या ह्याच प्रवासाची ही कहाणी !

 

संजय राऊत सुरूवातीचा काही काळ इंडियन एक्स्प्रेसच्या पुरवठा विभागात आणि  नंतर मार्केटिंगमध्ये काम करत होते. पुढे  इंडियन एक्सप्रेसच्याच लोकप्रभा या साप्ताहिकात क्राइम रिपोर्टर म्हणून काम करायला सुरुवात केलेल्या राऊतांनी गुन्हेगारी विषयातल्या बर्‍याच बातम्या केल्या.

 

पुढे 1989 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी ‘सामना’ सुरू केला. संजय राऊतांनी लिहीलेल्या लेखांवर बाळासाहेब नजर ठेऊन होते. राऊतांची भूमिका शिवसेनेची मिळतीजुळती असल्याचं बाळसाहेबांना लक्षात आलं आणि 1993 ला राऊतांवर सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी सोपवली. क्राइम रिपोर्टिंग पासून सुरुवात करून संपदकपदापर्यंत खूप कमी पत्रकार पोहोचले आहेत, सामनातल्या या पदामुळे राऊत त्या पत्रकारांच्या यादीत जाऊन बसले.

 

सामनातल्या अग्रलेखांमध्ये बाळासाहेबांसारखीच भाषा आणि लेखनशैली असल्याने सामनातले सांजय राऊतांचे अग्रलेख प्रसिद्ध होऊ लागले आणि शिवसैनिकांमध्येही राऊतांचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं.

 

सामनातल्या संजय राऊतांच्या शीवरल भाषेवर अनेकदा टीकाही झाली परंतु त्या टीकेला न जुमानता राऊत अग्रलेख लिहीत राहिले.

 

शिवसेनेचा आवाज बनलेला सामना आज मराठी माणसांमध्ये प्रसिद्ध असण्यात संजय राऊतांचा मोठा हात आहे. सामनाचे सगळे अधिकार राऊतांकडे आहेत. शिवाय ते राज्यसभेवर खासदारही आहेत. राजकीय नेता आणि संपादक म्हणून असलेली दोन्ही पदं राऊत जबाबदारीने सांभाळताना दिसतात.

 

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडनुकीच्या निकाला नंतर संजय राऊतांनी शिवसेनेसाठी महत्वाची भूमिका बजावली होती. शिवसेना आणि भाजप 2019 ची निवडणूक एकत्र लढले होते. शिवसेनेचे 56 तर भाजपचे 105 आमदार निवडून आले. मुख्यमंत्री भाजपचाच होणार ही मागणी शिवसेनेकडून संजय राऊतांनी लावून धरली आणि मुख्यमातृ पदाच्या या वादावरुन शिवसेना आणि भाजपची युती तुटली. पुढे शिवसेना-कोंग्रेस-राष्ट्रवादीचं महाविकासआघाडी सरकार सत्तेत आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेसाठी मुख्यमंत्री पदाची मागणी लावून धरल्याचा आणि सामनात अग्रलेख लिहून वेळोवेळी शिवसेनेची भूमिका मांडलेल्या संजय राऊतांमुळे हे शक्य झाल्याचं जनतेसमोर स्पष्ट झालं आहे.