भारतीय संविधानासाठी 750 संशोधनं करणार्‍या दुर्गाबाई देशमुख !

 

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासोबतच समजतील अनिष्ट रूढी परंपरांविरोधात लढणार्‍या महत्वाच्या स्त्रियांपैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे दुर्गाबाई देशमुख.

 

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांसोबतच अनेक स्त्रियांनी सक्रिय सहभाग नोंदवला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

 

आंध्रप्रदेशातील राजमुंदरी या छोट्याश्या गावात जन्म झालेल्या दूर्गाबाईंचं अगदी लहान वयातच लग्न झालं, परंतु प्रौढ होईपर्यंत नवर्‍यासोबत राहायला त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांचा हा विवाह टिकू शकला नाही. पुढे त्यांनी आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करायला सुरुवात केली.

 

असहकार चळवळीच्या वेळी  1921 ला आंध्रप्रदेशाती काकीनाडाला आले होते. देवदासींच्या प्रथेविरोधात काम करणार्‍या 12 वर्षांच्या लहानश्या दूर्गाबाईंनी महात्मा गांधींचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर पुढे गांधीजींनीही देवदासीच्या प्रथेविरुद्ध लढायला सुरुवात केली.

 

दूर्गाबाई देशमुख गांधीजींच्या विचाराने प्रभावित झालेल्या होत्या. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत आणि संविणय कायदेभंग चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. स्त्रियांना आरोग्यविषयक सुविधा सहजरीत्या मिळाव्यात म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले, त्यासाठी 1937 मध्ये दूर्गाबाईंनी ‘आंध्र महिला सभा’ सुरू केली. त्यामध्यमातून आरोग्यविषयक सेवा मिळाव्यात म्हणून तर प्रयत्न केलेच पण महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यायलाही सुरुवात केली.

 

शिक्षणासाठी स्त्रियांना त्याकाळी प्रचंड संघर्ष करावा लागत होता. अशा काळात दूर्गाबाईंनी ‘हिंदी बालिका पाठशाला’ सुरू केली. शाळेत इंग्रजी भाषेलाही त्यांनी विरोध केला.

 

संविनय कायदेभंग चळवळीतही दूर्गाबाई देशमुखांचा सहभाग होता. याच चळवळी दरम्यान मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या दूर्गाबाईना अटकही झाली होती.

 

सामाजिक आणि राजकीय चळवळीसोबत दूर्गाबाईंनी शिक्षणाकडेही दुर्लक्ष केलं नाही. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी राज्यशास्त्रात एम.ए. पूर्ण केलं आणि पुढे मद्रास युनिवर्सिटीतून लॉ केलं.

 

प्रौढ होईपर्यंत नवर्‍यासोबत राहायला नकार दिल्यामुळे दूर्गाबाईंचा पहिला विवाह टिकू शकला नव्हता, पुढे दूर्गाबाईंनी सी. डी. देशमुखांसोबत लग्न केलं. सी डी देशमुख 1953 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते पुढे भारटाचे अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिलं होतं.

 

स्त्रियांच्या उद्धारसाठी काम करणार्‍या दूर्गाबाई देशमुखांनी संविधान सभभेत महत्वाची भूमिका बजावली होती. 1946 ला संविधान सभेचा हिस्सा झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांची बाजू मांडली. महिलांना संपत्तीत अधिकार मिळण्यासाठी त्त्यांनी आग्रह धरला होता. या शिवाय न्याव्यवस्थेची स्वतंत्रता हिंदुस्तानी भाषेची राष्ट्रभाषा म्हणून  निवड करण्यात यावी अशा अनेक गोष्टींचं त्यांनी संविधान सभेत सामर्थन केलं होतं.

 

स्वतंत्र न्यायव्यवस्थेवरचे त्यांचे विचार आज सत्यात उतरले आहेत. संविधान सभेतील कार्यकाळात इतर सदस्यांसोबत दूर्गाबाई देशमुखांनी 750 संशोधनं केली होती. पुढे 1950 ला त्यांचा योजना आयोगातही समावेश करण्यात आला होता.

 

चीन, जपान सारखे देश फिरून, तिथल्या व्यवस्थेचा अभ्यास करून दूरगाबाईंनी भारतात कौटुंबिक न्यायालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.  परंतु दूर्गाबाईंच्या जिवंतपणी भारतात ही व्यवस्था सुरू होऊ शकलं नाही.

 

9 मे 1981 ल दूर्गाबाईं गेल्या. पुढे 1984 मध्ये फॅमिली अॅक्ट पास होऊन भारतात कौटुंबिक न्यायालय सुरू झालं.