एक लाखाहून जास्त महिलांचे नग्न फोटो इंटरनेटवर अपलोड करणाऱ्यांबद्दल तुम्हाला माहितीये का?

#CoupleChallenge आलं होत होतं मध्ये हे घपाघप लग्न झालेल्या पोरापोरींच फोटो पडायले इंटरनेटवर. मग नंतर ते वाले मेसेज आले घरची संस्कृती सन्मान पोरीचे फोटो फेसबकूवर नका टाकू हे ते असं तसं पण… काही दिवसांनी पोलीसांनी त्यांच्या ऑफिशल फेसबूक आयडीवरून असे फोटो टाकू नका ते मर्फ करून वापरले जावू शकतात असं सांगतलं तेव्हा भले भले शांत आले पण नेमकं मर्फ करणं असतं काय आणि त्याचा परिणाम काय होईल हेच सांगायला आलोय ना भावांनो. कोणत्याही महिलेच्या चेहरा कोणत्याही नग्न मॉडेलच्या चेहऱ्याशी रिप्लेस करून त्या महिलेचा नग्न फोटो सहज बनवता येतो आणि असे प्रताप करणारी टोळी, एप्स आणि इंटरनेट सुविधा सद्य़ा उपलब्ध आहेत.

ऐकायलाच किती भयानक वाटतं ना?

आर्टीफिशियल इंटेलिजेन्सजच्या बॉटच्या मदतीनं असं करणं शक्य आहे. साधारणतः एक लाखाहून जास्त महिलांचे असे नग्न फोटो बनवलेल गेल्याचे एका सायबर रिसर्च कंपनीच्यातपासात ही धक्कादायक माहिती समोर आलीये. हा रिसर्च केलाय तो नेदरलँडच्या सेंसिटी कंपनीनं.

हिंदूस्तान टाइम्समध्ये छापलेल्या एका रिपोर्टनूसार ज्या महिलांच्या फोटोंचा वापर करून असे नग्न फोटो बनवले गेले आहेत त्यापैकी अधिकतर महिला या रशियन आहेत. यात भारतीय महिलांचा आकडाही मोठा आहे.  गेल्या तीन महिन्यात दुप्पट वेगाने इंटरनेटवर असे फोटो पडत असल्याचं पुढं आलंय.

 

कसे तयार होतात हे फोटो.

सायबर विभागाकडून स्ट्रेस होणार नाहीत अशा ठिकाणी हे आर्टीफिशअर इटेलिजेन्सच्या मार्फत हे काम केलं जातं. इंटरनेट युजर्सनी या साईटवर जावून महिलेचा साधारण फोटो अपलोट केला की काही सेकंदाच्या आत त्या महिलेचा चेहरा नग्न महिलेच्या शरिराला जोडला जातो. जे सहजासहजी ओळखता येत नाही. या सर्विसचा वॉटरमार्क या फोटोंवरती असतो पण काही पैसे भरल्यास तो वॉटरमार्कही हटवला जावू शकतो.

या सर्विसशी जोडलेल्या टेलिग्राम चॅनेल्सवरती हे फोटो पाहिले जावू शकतात. डीपन्यूड नावाची कंपनी ही सर्विस देते. ज्या कंपनीवर या प्रकरणात दोषी ठरवलं जातंय त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. पण हि सर्विस २०१९ला विकली गेली होती. त्याचा दुरुपोग नग्न फोटो केला जातोय.

 

CEO जॉर्जियो पट्रिनी

हा गंभीर प्रश्न आहे. एका साधारण फोटोचा इतका दुरुपयोग होत असेल तर होणारे परिणाम भयानक होतील. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारांमध्ये वाढ होते आहे. गेल्या काही दिवसात डीपफेकचं प्रकरणांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

 

डीपफेक’चं जग

डीपफेक हे ह्युमन इमेज सिंथेसिसवर काम करणारी टेक्नोलॉजी असते. जसं आपण कोणत्याही फोटोचं फोटोशॉप करतो तसं ही इंटनेट सर्विस एका क्षणाच्या आत फोटो हवा तसा बदलते. या  टेक्नोलॉजीच्या आधारावर अशी असे एप्स बनवले जातात. ज्याच्या आधारे कोणाच्याही चेहरा कोणत्याही फोटजवर लावता येतो.

 

कायदा काय सांगतो.

सायबर क्राईम एक्टच्या सेक्शन 66 इ नूसार याविरुद्ध केस दाखल होते. यात कोण्याही व्यक्तीचे प्रोयवेट पार्ट्स दाखवणे अपराध आहे. सेक्शन 67 ए नूसारही कारवाई होवू शकते. ज्यात सेक्शूअल मटीरिअल दाखवण्याबद्दलची तरतूद आहे. भारतीय दंडसंहिता 499नूसार या प्रकरणात केस नोंदवली जाते.

बदलत्या काळासोबत इंटनेटनं महाकाय रुप धारण केलंय. इंटरनेटच्या फायदे तर आहेतच पण त्याचे तोटेही आहेत. अशा परिस्थीतीत स्वतःची आणि परिवाराची डीजीटल जगात काळजी कशी घ्यायची असा प्रश्न सर्वांनाच पडलाय पण टेन्शन नॉट टीम गोफण है ना.