अशी करा मशरूमची शेती आणि कमवा लाखो…

देशात कोरोना पसरला आणि उत्पादनाची साधनं जवळपास बंद झाली. लॉकडाऊन उठून बाजार पून्हा सूरू झाला असला तरी परिस्थीती वाईटच आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. परतीच्या पावसानं केलेल्या नूकासनीमुळं शेतकऱ्याच्या हातात काहीच उरलं नाही. एकीकडं कांदा शंभरी गाठणार आहे. हातात अजिबात पैसा नाही आणि दुसरीकडं जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती यावर मात कशी करायची. यातून बाहेर कसं पडायचं याच विचारात आहेस ना भावड्या?

आधी कपाळावरचा हात काढ आणि ऐक…अशी बिझनेस आयडीया ज्याच्यात फक्त ५ हजार गुंतवायचे आणि महिन्याला लाखो कमवायचे विश्वास बसत नाही ना? पण हे खरायं.

कमीत कमी संसाधनाच्या वापरातून हा व्यवसाय सूरू केला जावू शकतो. चला तर मग तपशीलवार जाणून घेवूयात.

मशरूमची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकर्‍यांसाठी एक प्रकारचे वरदान आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल. मशरूमच्या उत्पादनासाठी शेतातील टाकाऊ गोष्टींचा वापर केला जाऊ शकतो. उदा. उसाची वाळलेली पाने, केळीची पाने व बुंधा, कापसाची वाळलेली झाडे, सोयाबीनचा कुटार, मक्याची व ज्वारीची धाटे अशा साधनांचा वापर करता येतो.

मशरूमच्या विविध जाती आपल्याकडे पाहायला मिळतात. बटन, शिंपला, धानपेढ्यांवरील या जातींची लागवड केली जाते. १९८३ साली स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय अळिंबी संशोधन केंद्राच्या’ माध्यमातून विविध मशरूम्सच्या जाती संशोधित करण्यात आलेल्या आहेत. जसे की काबुलभिंगरी/धिंगरी, यू-३, एस-११, एस-७६, एस-७९१, एनसीएस-१००, एनसीएस-१०१/१०२, एनसीबी-६, एनसीबी-१३ इत्यादी. भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे व त्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

 

बिझनेस आयडीया

देशात बहूसंख्य शेतकरी मशरूम शेतीकडं वळलेत. दरमहिन्याला यातून चांगल उतपन्न त्यांना मिळतं. यासाठी करावी लागणारी गुंतवणूक पण कमी आहे. एक खोलीत तुम्ही या व्यवसायाला सुरूवात करू शकता. आणि यासाठी सुरूवातीला तुम्हाला फक्त ५ ते ६ हजारांची गुंतवणूक करावी लागेल.

 

जागा कशी निवडायची

यासाठी तुम्हाला १२० ते १५० फुट प्लॉटची गरज लागेल. त्यात मश्रूम उगवण्यासाठी लागणाऱ्या मातीचं आणि मश्रूमच्या बीयांचं मिश्रण करावं लागेल.

प्रामुख्यानं या दोन जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.

बटन मशरूम :

बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतावर केली जाते. दीर्घ मुदत किंवा अल्प मुदत या पद्धतीत कंपोस्ट तयार करून पिशव्यांमध्ये भरले जाते व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. बारा अंश सेल्सिअस तापमानात हे उत्पादन घेतले जाते. बटन मशरूमची लागवड पंजाब, हिमाचल प्रदेश, आसाम आदी राज्यांत होते.

 

शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) :

नैसर्गिक वातावरणात या मशरूमची लागवड केली जाते. संपूर्ण भारतभर शिंपला मशरूमचे उत्पादन होते. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्प खर्चीक आहे. मशरूम लागवडीसाठी जागा, पाणी, कच्चा माल, प्लॅस्टिक, बियाणी, वातावरण, यंत्रसामग्री आदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

 

मशरूम लागवड प्रक्रिया :

मशरूम लागवडीचे विविध टप्पे आहेत. प्रथम पाण्यात ‘काड’ भिजवून मग त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर पिशव्यांमधून बी भरून उगवले जाते. चौदा ते वीस दिवसांनंतर पिशवी काढली जाते व नंतर बी पेरणी केली जाते. पिशवी फाडल्यानंतर चार-पाच दिवसांतच मशरूमची पूर्ण वाढ झालेली असते. मशरूम दोन दिवसांत उन्हात पूर्णत: उत्तम वाळते. वाळवलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.

 

किती दिवसात उगवले जावू शकतात मशरूम
मशरूम उगवण्यासाठी लागणार खत बाजारात सहज उपलब्ध होतं. याशिवाय आधीच तयार असणारं कम्पोजट खतही सहज उपलब्ध होतं. यासाठी खास प्रकारे पॅकेट्स बनवावे लागतात. ज्यांना सावलीत किंवा खोलीच्या आत ठेवावं लागतं साधारणपणे २० ते २५ दिवसांच्या आत मशरून उत्पादनाला सुरूवात होते.

 

अशी करता येईल मशरूमची विक्री

मशरूम उगवल्यानंतर त्यांना लहान लहान पॅकेजेसमध्ये पॅककरून त्यांची विक्री करता येते. थेट बाजारात तुम्ही हे मशरूम विकू शकता, भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या मोठ्या कंपन्याशी संपर्क साधून मशरूम विक्रीसाठी तुम्ही ठेवात येईल

 

मशरूम उत्पादन घेताना घ्यावयाची काळजी :

१) परिसर स्वच्छ ठेवावा.

२) उत्पादन बंदिस्त जागेत घ्यावे.

३) मशरूमच्या खोलीत खेळती हवा असावी.

४) काडाचे निर्जंतुकीकरण महत्त्वाचे.

५) काडणी वेळेत करावी.

 

मशरूमचे औषधी गुणधर्म :

१) मशरूममध्ये जास्त प्रथिने व कमी ऊर्जा आहे. त्यामुळे मधुमेहींना ते उपयुक्त आहे.

२) किडनीच्या रोगांवर उपयोगी

३) लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार

४) पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत करते.

मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात. या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

विशिष्ट मोसमात आणि वर्षभर उगवणार्‍या मशरूमला देशांतर्गत व देशाबाहेर निर्यात केले जाते. आपल्या देशात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, महाराष्ट्र, पंजाब, गोवा आदी प्रांतांत मशरूम उगवते. इंग्लंड, अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, स्वित्झरलँड व इतर काही देशांमध्ये निर्यात केली जाते. मशरूमला भावही चांगला मिळतो. घाऊक बाजारात आपल्याकडे ताजा मशरूम ५० ते १०० ₹. प्रति किलो मिळतो.

कोरोनानंतर लोक आरोग्याविषयी जागरूक झालेत. मशरूमसाठी त्यांची मागणी वाढते आहे. आजाराला दूर ठेवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या मशरूमची शेती करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.