माजुरड्या औरंगजेबानेही धरले होते जेजूरीच्या मल्हारी मार्तंडाचे पाय.

शिवछत्रपतींच्या निधनानंतर शंभूमहाराजांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला. आदिल, निझाम, मुघल, पोर्तूगीज, इंग्रज कुणाचीच गय केली नाही. बुऱ्हानपूऱ्याची लुट तर आलमगीर औरंजेबाच्या कानशीलात लगवल्या सारखी होती. शिवछत्रपतींच्या जाण्यानंतर मराठे कमजोर होतील. दख्खन सहज हस्तगत करता येतील. पण संभाजी महाराजांनी त्याची स्वप्न धुळीस मिळवली.

मोठ्या संघर्षानंतर संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबानं त्यांची हत्त्या केली. एकानंतर एक हिंदू मंदिर पाडायला सुरुवात केली. देवतांच्या मुर्त्या त्यान बाटवल्या. मंदिरं उध्वस्त केली. त्यानं पुरंदरकडं त्याचा मोर्चा वळवला.

कोरीव कामासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भुलेश्वर मंदिराचा आणि मुर्त्यांचा त्याने विध्वंस केल्यानंतर त्यानं जेजूरी गडाकडं कुच केली. औरंगजेब येत असल्याची वार्ता गडापर्यंत आली. मोघलाचं सैन्य जेजूरीवर येवून धडकलं.

गडाचे दरवाजे बंद होते. गडाचा रखवालदार यशवंत हत्यारबंद होवून मुख्यप्रवेश द्वाराच्या उजव्या बाजूला उभा होता. यशवंताला बघून मुघल सैन्यात संताप निर्माण झाला. यशवंताला ठार मारून गडात प्रवेश करण्यासाठी मुघल सैन्यानं भींतीला छिद्र पाडून सुरुंग भरायला सुरुवात केली. सुरुंगात ठासून दारू भरली गेली. सुरुंगाला बत्ती देणार इतक्यात अक्रीत घडलं. त्या भिंतींच्या छिद्रातनं लाखो भूंगे बाहेर आले. मुघल सैन्यावर तुटुन पडले. सैन्याला मैदान सोडून पळण्याशिवाय दुसरा मार्गच काय उरला होता. भुंग्याचा प्रतिकार करणं तर निव्वळ अशक्य. ही घटना औरंगजेबाच्या कानावर आली. तो छावणीतून बाहेर आला. पाहतो तर काय? वाट मिळेल तसं, चौ बाजूनं मुघल सैन्य धावत पळत सुटल्याच त्यानं बघितलं. उभ्या आयुष्यात मुघल सैन्याला असं बिथरलेलं औरंगजेबानं पाहिलं नव्हतं. भूंग्यांनी पाच मैल मुघल सैन्याचा पाठलाग केला.

औरंगजेबाला त्याची चुक लक्षात आली. तो ताडकन् जमिनीवर बसला. त्याचे सरदार, वजीर, शिपाई थक्क होवून पाहत होते. त्यानं दोन्ही हात जोडेल. देव मल्हारी मार्तंडाच्या नावानं तो करुणा भाकू लागला. क्षमायाचना करू लागला. त्याचं सैन्य त्याला वाचवायचं होतं. बोलता बोलता त्याच्या तोंडून उद्गार निघाले,

हे मल्लुखान मी चुकलो, गुस्ताखी झाली, मला माफ कर, तुला सव्वा लाखाचा भुंगा अर्पण करतो, हे भुंगे परत बोलवून घे. मी चुकलो. मला क्षमा कर!” यानंतर काही क्षणातचं भूंगे अदृश्य झाले.

 

काही दिवसानंतरचं बादशाह जेजूरी गडाला आला. म्हाळसाकांत चरणी औरंगजेब नतमस्तक झाला. मल्हारी मार्तंडाच्या चरणावर त्याने पाय टेकले. खंडेरायाची प्राथना केली. तेव्हापासून खंडोबा हा मुस्लिमांचेही दैवत बनले. त्याची मल्लुखान म्हणून मुस्लीम समाजात पुजा केली जाते. अनेक मुस्लीम भक्तगण जेजूरीला श्रद्धेनं भेट देतात. औरंगजेबाचा पुरंदरमध्ये वावर पाहता ही घटना १७०० ते १७०७ दरम्यान घडल्याचा अंदाज लावला जातो.

उमाजी नाईकांनी पुढच्या काळात हा भूंगा चोरून नेल्याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या शब्द कोषात आढळतो. परंतू हे साफ खोटंय. उमाजीराजे खंडोबाचे उच्च कोटीचे भक्त होते. असा अपराध त्यांच्या हातून घडणं निव्वळ अशक्य. पूना गॅझेट ग्रंथामध्ये हा भूंगा कोळी आणि देवाच्या पुजाऱ्याने चोरल्याचा उल्लेख आहे.