महाराजा यशवंतराव होळकरांना रोखण्यासाठी इंग्रजांनी शीखांशी केला होता तह

 

राजराजेश्वर महाराजाधिराज श्रीमंत सवाई यशवंतराव होळकरांचा राज्यारोहन सोहळा मोठ्या दिमाखात शाही पद्धतीनं येत्या ६ जानेवारीला साजरा होणाराय. होळकर राजघराण्याचे वंशंज श्रीमंत भूषणसिंह होळकर या सोहळ्यासाठी उपस्थीत राहतील. या सोहळ्याच्या अनुषंगाने राज्यभरात पुन्हा महाराज यशवंतराव होळकर नावाच्या रणमार्तंडाच्या पराक्रमाची चर्चा होतीये. इंग्रजांना रणभूमित धुळ चारणारा, ग्वाल्हेरच्या शिंद्यांना लोळवणारा, पेशव्यांना पुणं सोडून पळायला लावणारा हा महापराक्रमी योद्धा कोण होता? हे समजण्यासाठी त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना माहिती करुन घ्यायला हव्यात.

महाराजा यशवंतराव होळकरांना रोखण्यासाठी इंग्रजांनी शीखांशी केलेल तह. यशवंतरावांची इंग्रजांना किती धास्ती होती याची कल्पना तुम्हाला करवून देईल.

महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या विरोधात जोरदार मोहिमा उघडल्या होत्या. त्याचवेळी जर एतेद्दीशीय इतर राजांनी महाराजा यशवंतराव होळकरांच्या नेतृत्वात जर इंग्रजांच्या विरोधात लढले असते तर आजच्या स्वतंत्र भारताचा इतिहास काही निराळाच लिहून ठेवावा लागला असता. पण इतिहासात जर.तर ला स्थान नसते हेच खरे. इंग्रज व शीख राजांच्या स्नेहसबंध जुळायाला यशवंतराव होळकर कसे कारणीभूत ह्याचा थोडक्यात आढावा.

इ स 1803 साली इंग्रजांनी मराठ्यांच्या सैन्याचा ‘ दिल्ली ‘  व   ‘ लासवारी’  या दोन ठिकाणी पराभव करून आपले ठिकाण निशाण ‘  सीस सतलज टेरीटेरी ( सतलज नदीच्या काठच्या प्रदेश ) वर आणून रोवीले . नंतर दुसऱ्यांवर्षीच म्हनजे इस 1804 त यशवंतराव होळकराणे इंग्रज सेनापती कर्नल सेनापती कर्नल ‘  मानसन याचा पराभव करून त्यास दिल्ली येथे वेढा दिल्याचे समजल्यावर कर्नल ‘  आक्टर लोनी व बर्न ह्या दोघा इंग्रज सरदारानीं महंतप्रयत्नाने वेढा उठविला. ह्या नंतर काही काळ फारशी हालचाल न करता  यशवंतराव होळकर  पंजाब प्रांतातील सतलज नदीच्या दक्षिणेकडील भागात नवीन लष्कर बनविण्यासाठी साठी खटपट चालु केली . यशवंतराव काही काळ पतीयाळा च्या राजा कडे येऊन राहिले परंतु त्या राजाने असे पाहिले कि ,  आपन यशवंतराव होळकरांना आश्रय दिल्याचे कंपनीला समजले तर तर ते त्या सरकारास मान्य होनार नाही कारण आपला व कंपनी सरकारचा जो पूर्वीपासून सलोखा आहे त्यात व्यत्यय येईल कंपनी सरकार आपल्या राज्यावर चालून येईल व आपल्या वर सूड उगवेल ह्या भीतीने त्याने यशवंतराव होळकरांना तेथून निघून जाण्यास सांगितले. सदरहू प्रमाणेच त्या प्रांतातील इतर दुसऱ्या शीख संस्थानिकांनी ही यशवंतराव होळकरांस मदत दिली नाही. या मुळे हताश होऊन यशवंतराव होळकरांना अमरूतसर ला परत यावे लागले. 

तेथे आल्यानंतर त्यांची व रणजित सिंग फत्तेसिंग अहुवालीया व झिंद चा राजा भागसिंग यांची गाठ पडली परंतु हे  वर्तमान इंग्रज सरदार जनरल लेक याला समजताच तो होळकरांचा पाठलाग करण्यासाठी इस 1805 साल च्या ऑक्टोबर महिन्यात आपल्या फौजेनिशी अमरूत सर मध्ये दाखल झाला तेंव्हा कलकत्याच्या गव्हर्नर जनरल कडून रणजित सिंहा बरोबर मैत्रीपूर्ण तह करण्याच्या बाबत लिहून आले . इस 1806 साली रणजित सिंह व इंग्रज यांच्यात तह झाला तो पुढीलप्रमाने

1) यशवंतराव होळकर यास आश्रय न देता त्यास अमरूतसर येथून जाण्यास सांगावे.

2) यशवंतराव होळकरांस कोणत्याही प्रकारे शीख सरदारानीं साहाय्य करु नये. 

फक्त ह्या दोनच कलमाच्या आधारे शीख व इंग्रज यांच्या मध्ये तहनामा झाला . 

आणि ह्याचा मोबदला म्हणून कंपनी सरकार ” सदरील तीन असामिनी वरिल कलमे पाळल्यास कंपनी सरकार त्यांच्या मुलुखावर लष्कर न पाठवता शत्रू पासून त्यांचे चांगले  संरक्षण  करेल. ” म्हणजेच यशवंतरावांना आश्रय न दिल्यामुळं शिखांच्या राज्यावर इंग्रज चाल करणार नाहीत. व कोणापासून त्यांना धोक निर्माण झाला तर इंग्रज त्यांच्या राज्याचे संरक्षण करतील असा लेखी 

या सर्व घडामोडी वर शाहीर खाडिलकर यांचा पोवाडा देखिल  भाष्य करणारा आहे. 

 

यशवंत गेला अमरूतसरला । तिथं भेटला रणजितसिंहाला ॥ ( दि 10-12-1805)यशवंत काय बोलला त्याला ।  तुम्ही जर सामील व्हाल आम्हाला ।  तर ताम्राची ( इंग्रजांची )चटणी करु या वेळला ॥ पण रणजितसिंह बोलला । “यशवंतराव ! तुम्ही म्हनता ते खरं पण अजुन बख्त योग्य नाही त्याला । ताम्राशी सध्या करा सल्ला ।  पुढं पाहू त्या विचारला ।  असं म्हणून त्याने पाठवला वकील भागसिंह इंग्रज तळाला ॥ यशवंत जड झाला सर्वांना । म्हणून कंपनीने तह केला व्यासघाटाला ( 06-01-1806)

संदर्भ 

महाराजा रणजित सिंह यांच्या चरित्र

भिकोबा अंनत प्रधान

 

शब्दांकन

मधूकर हाक्के

इतिहास संशोधक, मरहट्टी इतिहास संशोधक मंडळ.