नववर्षात गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवाच…

गेल्या वर्षात कोरोना, लॉकडाऊन आणि क्वचित आर्थिक मंदीची झळ आपल्याला बसलीये. यामुळं आर्थिकदृष्ट्या लोक सजग झालेत. २०२१च्या नव्या वर्षाची सुरुवात करताना नवे संकल्प करणार असाल तर या संकल्पांमध्ये गुंतवणीकीच्या संकल्पांचाही सामावेश करायला हवा.

२०२१साठी ५ गुंतवणूक संकल्प-

गुंतवणूकीस सुरुवात

  • अर्थविषयक बाबींचा विचार केला तर अनिश्चितता असल्यामुळं आपतकालीन वेळेसाठी आपल्याकडे फंड असायलाच हवा. यामुळं कुटुंबाला अर्थिक संरक्षण मिळतं. त्यासोबतच संपत्ती निर्माण करण्याचे स्त्रोतही आपोआप तयार होतात.
  • फंड्स शिल्लक असतील तर गुंतवणूकीची योग्य संधी साधता येते. व्यवस्थीत अर्थ नियोजन करता येते.
  • जितकी गुंतवणूक कराल ती कायम ठेवा. बाजारत संधी मिळाताच तर जितकी संपत्ती जमवलीये तितकीच ती वाढेल.

 

खर्चावर नियंत्रण

गुंतवणूकीचा विचार करत असाल तर खर्च कमी करायलाच हवा. यासाठी एक म्हण खुप प्रसिद्ध आहे. “जास्त पैसे कमवायचे असतील तर जास्त पैसे खर्च करावे लागतील.” म्हणजेच पैसा असा खर्च करा की त्यातून पुन्हा पैसे निर्माण होतील. म्हणजे किरकोळ खर्च वाचवून हजार दोन हजार डिमेट अकाउंटमध्ये नक्कीच गुंतवू शकता. ज्यातून उत्तपन्नाला सुरुवात होईल.

 

अर्थिक ज्ञान वाढवण्याबाबत

गुंतवणूकीचे संपूर्ण ज्ञान नसेल तर कमी नफा आणि जास्तीचं नुकसान होण्याची शक्यता असते. तुम्हाला ही चुक टाळायची असेल तर एखादा अर्थविषयक सल्लागार, इनव्हेस्टमेंट वेबसाईट किंवा अॅपच्या शिफारसीनूसार गुंतवणूक करणार असाल तर त्यासंबधी स्त्रोतांची माहिती करुन घ्या. योग्य माहिती असल्यास परतावाही योग्य मिळतो. त्यामुळं नूकसानही टाळता येते.

बऱ्याचदा गुंतवणूकीसंबंधीत आपले निर्णय हे ऐकीव ज्ञानावर अवलंबून असतात. स्वतः खातरजमा करत नसल्यामुळं अनेकदा तोट्याला सामोरे जावे लागते. यातून योग्य मार्ग काढण्यासाठी योग्य त्या स्त्रोतांकडून, अर्थतज्ञांकडून आपण माहिती करवून घेतली पाहिजे. आणि ती माहिती देण्यासाठी टीम गोफणही तुमची मदत करेलच.

 

गुंतवणूकीत वैविध्य ठेवण्याबाबत

गुंतवणूक करुन पैसा कमवण्याची कल्पना जरी सोप्पी असली तरी त्यातून नफा कमावणं वाटतं तितकं सोप्प नाही. मार्केटवर तुमची चौकस नजर असली पाहिजे. गुंतवणूक करताना विविध ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. महान गुंतवणूकदार वॉरेन बफेटही हा सल्ला देतात.

गुंतवणूकीत वैविध्य ठेवण्याबाबत ते सांगतात. शेअरमध्ये पैसा गुंतवत असाल तर लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही कंपनीत पैसा गुंतवा. सोन किंवा चांदित गुंतवणूक करून चांगला समतोल साधता येतो. वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणूक जोखीम कमी करते. आणि यामुळं धोका ही टाळता येतो.

 

कोडींगबद्दलच ज्ञान मिळवणे

भारतात आज एकूण ट्रे़डसपैकी ७५टक्के ट्रेड्सहे अल्गोरिदमीक ट्रेड्स आहेत. या ट्रेडींगला अल्गो ट्रेडींग म्हणतात. यामुळं सिक्युरिटीज ऑटोमेटिकली खरेदी किंवा विक्री करता येणं शक्य होतं. ट्रेडींगसाठी या व्हर्च्यूअल मॉडेलचा वापर होतो. योग्य गुंतवणूकीसाठी कोडींगच ज्ञान असणं गरजेचं आहे. ते शिकणं इतकीही अवघड नाही. सोप्या पद्धतीनं ते आत्मसात करता येतं.

या सोबतच डिजीटल ब्रोकर्सच्या माध्यमातून अल्गोरिदमीक चार्ट बनवण सोप्प जातं. यासाठी हिस्टॉरिक आणि रिअर टाइम डेट्याचाही वापर करता येतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मॅन्युअल खरेदी विक्री करण्याच्या तुलनेत ट्रेडिंग करताना या पद्धतीद्वारे प्रीमीयम रेट्स भेटतात. अमेरिकेसह प्रगत युरोपीयन देशात ८० % हून अधिक ट्रेड्स हे अल्गोरिदम द्वारे सेट केले जातात. भारतात पायथॉन, जावा आणि आर भाषा अवगत केल्यास तुम्हाला यात बाजी मारता येईल. उंची गाठता येईल. भविष्याती ट्रेड्सचा बहूतांश भाग अल्गो ट्रेड्स घेतील तेव्हा या गेममध्ये पक्के खिलाडी बनण्यासाठी तुम्ही कोडींगच ज्ञान घेतलंच पाहिजे.

२०२१चा आज पहिला दिवस. संकल्पानांचा दिवस. दरवर्षी प्रमाणं संकल्पना करुन त्या अर्धवट सोडतो तशा या अर्थविषय संकल्पना सोडू नका. कोरोनाकाळातून गेल्यानंतर गुंतवणूक आणि अर्थिक सुरक्षिततेचे महत्त्व आपोआप आधोरिखित झालंय. अशा प्रसंगातून बाहेर निघण्यासाठी लागणारा आत्मविश्वास पुरवायला टीम गोफण या पुढंही तुमच्या सोबत असेल. नवीन वर्षाच्या शुभेच्छा