महाराष्ट्रात अशी मिळणार कोरोनाची लस….

सरत्या वर्षाबरोबर कोरोनाची भिती आणि लॉकडाऊनची दहशतही सरावी अशी प्रत्येकाचीच इच्छाय. कोरोनाची लसच ही इच्छा पुर्ण करू शकते. पण कोरोनाची लस बाजारात आल्याच्या अनेक बातम्य आल्या असल्यातरी त्या आपल्यापर्यंत पोहणार कशी. महाराष्ट्रात तिचं वितरण होणार तरी कसं असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर काळजी करू नका. याच प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कोरोना लशीच्या बातम्यांना उत आला असला तरी भारतात अजून तरी कोणत्यास लशीला मान्यता देण्यात आली नाहीये. पण ज्या कोणत्या लशीला मान्यता प्राप्त होईल त्या लशीची लसीकरण मोहीम राबवायची कशी या? या मसलतींना वेग आलाय.

महाराष्ट्रात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणासाठी एक सुकाणू समितीची नेमणूक करण्यात आलीये. राज्यस्तरीय सुकाणू समतीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरीय तालुका कृती दल, अशी यंत्रणा उभरली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई मनपानं स्वतःचा टास्क फोर्स उभारलाय.

 

कोणाचा लागेल पहिला नंबर?

राज्यात होणाऱ्या कोरोना लस वितरणाबद्दल बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “साधारणपणे ११ कोटीतल्या ३ कोटी लोकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यासाठी केंद्र सरकार सोबत संगनमताने नियोजन सुरुये.”

लसीकरण प्रक्रीया सोपी व्हावी म्हणून प्राधान्याने तीन गटात नागरिकांची विभागणी करण्यात आली आहे.

  • पहिला गट: शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा या गटात सहभाग असेल.
    आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गटाचे नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलंय.
  • दुसरा गट: कोरोनाशी दोन हात करणाऱ्या फ्रन्ट लाईन वर्कर्सचा या गटात सामाविष्ट असेल. पोलिस दल, सैन्य दल, होमगार्ड, नागरी संस्थातले, मनपातले कर्मचारी इत्यादी.
  • तिसरा गट: ५० वर्षावरचे लोक ज्यांना इतर व्याधी व आजार आहेत. अशा व्यक्तींचा यात सामावेश आहे.

 

लशीसाठी नंबर कुठं लावायचा?

देशात लसीकरणासाठी नोदणी मतदार याद्याच्या धरतीवर केली जाईल. त्यांचा वापर करुन वेगवेगळ्या वयोगटातल्यी लोकं शोधून Co-Win म्हणजे कोव्हिड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क नावाच्या डिजीटल प्लॅटफोर्मवर ही नोंदणी केली जाईल. प्रतिदिन एका सत्रात १०० ते २०० लोकांना दिली जाईल. लस दिल्यानंतर त्यांना अर्धा तास तसेच बसावं लागेल. त्याचं निरीक्षम केलं जाईल. एकावेळी फक्त एकालाच कोरनाची लस टोचावी असा सुचना केंद्राच्या वतीने करण्यात आल्यात.

 

भारतात कोणती लशीचा होणार वापर?

पहिल्या टप्प्यात ६० कोटी लोकांना ऑगस्ट २०२१च्या अखेरपर्यंत लस दिली जाईल असं व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य व्हि. के. पॉल यांनी सांगितलं य.
भारतात पुण्याच्या सिरम इन्टीट्यूनं आणि भारत बायोटेक या कंपनीनं नियमकांकडे आपत्कालीन परिस्थितीतल्या तातडीच्या वापरासाठी परवानगी मागतली असून त्यावर कोणत्याच प्रकारचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. यासोबतच रशियाच्या स्पुटनिक ५ या लशीचाही केंद्रीय आरोग्य मंत्रालय विचार करतंय. यापैकी एक लशीला सद्या तातडीची मान्यता भारतात मिळू शकते.

 

कधी सुरु होईल लसीकरण

जानेवारी २०२१ पर्यंत तातडीची परवानगी घेवून लसीकरण सुरु होईल अशी आशा सीरमच्या सायरस पुनावाल्यांनी व्यक्त केलीये. लसीकरणासाठी १६,२४५ कर्मचाऱ्यांनी को- विन पोर्टलवर नोंदणी केलीये. या लसीकरण टीममध्ये पाच सदस्यांचा सामावेश करण्यात येईल. लशीच्या साठवणूकीसाठी राज्य स्तरावर १, विभागिय स्तारावर ९, जिल्हास्तरावर ३४ तर महामंडळाचे २७ शितगृह तयार करण्यात आलीये. ३,१३५ साखळी केंद्र उपलब्ध करुन देण्यात आलेत.