कोरोनाचं विषय मिटायच्या आत बर्ड फ्लूची एंट्री

कोरोना आहोटीला लागला असं म्हणयला सुरुवात झालीच होती की इतक्यात नव्या महामारीनं हैदोस घालायला सुरुवात केलीये. बर्ड फ्लू नावाच्या. मध्यप्रदेश, राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश आणि झारखंडात मोठ्याप्रमाणात पक्षी मरताहेत. उत्तरेत पसरलेला हा रोग महाराष्ट्राचा उंबरठा ओलांडेल का? हीच भीती नागरिकांना सतावते आहे.

अनेक राज्यात सुरुये बर्ड फ्लूचा प्रसार

मागच्या आठवड्यात केरळ, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानच्या राज्य सरकारांनी पुष्टी केली की त्यांच्या राज्यात मोठ्या प्रमामात पक्षाचा मृत्यू होतो आहे. मध्यप्रदेश आणि गुजरातमधूनही अशाच बातम्या येताहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी पक्षी मरत असले तरी सरकारने बर्डफ्लू असल्याचा दावा अजून मान्य केलेला नाहीये.  हिमाचल प्रदेशच्या हस्बेंडरी डिपार्टमेंटमधील वरिष्ठ वेटनरी पॅथोलॉजिस्ट आणि बर्ड फ्लूचे राष्ट्रीय कंसल्टंट डॉक्टर विक्रम सिंह सांगतात की,हिमाचल प्रदेशात सोमवारी २४०० पक्षांचा मृत्यू झालाय. यामुळं धोका वाढल्यासारखं वाटतं.

इंदौरातून सुरु झाला बर्ड फ्लू

मध्यप्रेदेशात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्य होतोय. त्यामगचं कारण बर्ड फ्लू असल्याची पुष्ठी झालीये. यानंतर लगेचच प्रशासनानं बर्ड फ्लू अलर्ट जारी केलाय. इंदौरच्या डेली कॉलेज कॅंपस भागात रात्री कावळे विसावतात. तिथं सकाळच्या आसपास २०-३० कावळ्यांचा मृत्य झाल्याचं आढाळलं. या काळ्यांचा पशुरोग संस्थेत परिक्षण करण्यात आलं. यानंतर ११४ कावळ्यांचा मृत्यू झाला. इंदौरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला.

निर्जंतूकीकरणाला सुरुवात झालीये.

मध्यप्रदेशात पक्षी जिथंही विसावा घेतात त्या सर्व जागेंचे निर्जंतूकीकरण करण्यास सुरुवात झालीये. झाडाखाली बसण्यास नागरीकांना मनाई करण्यात आलीये. मध्यप्रदेशच्या इंदौरसह खांडवा, बडवानी, मंदसौर, नीमच, सिहोर, रायसेन आणि उज्जैन समवेत अनेक ठिकाणाहून पक्षांच्या मरण्याच्या बातम्या येताहेत. बर्ड फ्लू विषाणूपासून वाचण्यासाठी हाय अलर्ट या राज्यात दिला असून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.

काय आहे बर्ड फ्लू आणि किती खतरनाक आहे ?

जास्त लोड न घेता साधं सोप्प्या पद्धतीत समजायचं झालं तर बर्ड फ्लू हा पक्षांमधला कोरोना आहे. ही एक अशी महामारी आहे जी पक्षांपासून पक्षांपर्यंत पसरते. तसेच पक्षांपासून जर हा विषाणू इतर प्राणी अथवा माणसांमध्ये पसरल्यास तो जीवघेणाही ठरु शकतो. १९९७ला बर्ड फ्लूची पहिली केस समोर आली होती. तेव्हा यामुळं संक्रमीत झालेल्या ६० टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. पण, एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीला याची लागण सहज होती नाही ही जमेची बाजूये. क्वचित काही केसेसमध्ये एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लूच्या विषाणूची लागण झालीये पण याचे प्रमाण अत्यंत कमीये.

कोरोनाच्या तडाख्यात शेतकऱ्यांना  मोठ्या नूकसानीला सामोरं जावं लागतंय. शेतीमलाचं उत्पन्न आलं नाही. शेतीपूरक दूध व्यवसाय ठप्पप होता आणि कुकुट पालन अफवांना बळी पडलं. सर्वच आघाड्यावर नूकसान पदरात पडलेल्या शेतकऱ्याच्या आशा लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. पण बर्ड फ्लूमुळं संकटाचे ढग दाटलेत. महाराष्ट्रात अजून बर्ड फ्लूचा प्रसार नाही शासनाने वेळेत कडक उपाय योजन करुन यातून शेतकऱ्यांची मदत करावी अशी सामान्य शेतकऱ्यांकडून मागणी केली जातीये.