हे अ‌ॅप्स आहेत शेतीसाठी महत्त्वाचे…

क्षणक्षणाला बदलणारं तंत्रज्ञान आणि बाजारभावांचा आभ्यास करुन पुढच्या शेतीमालाची आखणी शेतकऱ्याला करता आली तर शेतकऱ्याला मोठा फायदा मिळू शकतो. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची सुद्दा बचत होवून त्याला चांगला मोबदला मिळवा म्हणून अधूनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांनी कास धरायला हवी पण हे वाटतं तितक सोप्प नाही.

याच अडचणींवर मात अँड्रोईड अप्स उपलब्ध आहेत जे शेतकऱ्यांसाठी महत्तवाचे आहेत.भारतातले सर्वच क्षेत्र डिजीटल होत असताना शेतीक्षेत्र ही त्याच वाटेवर आहे. बदलते हवामान, बाजार भावांचे चढउतार  बाजारपेठांच्या मागण्या या सर्व गोष्टींचा ताळेबंद शेतकऱ्याजवळ रहावा म्हणून काही अँड्रोइड अॅप्स महत्त्वाचे आहेत.

 

Agri App

शेतकरी वर्गाच्या सर्वाधिक पसंतीला उतरलेलं हे अ‌ॅप असून ५ पैकी ४.३ इतकं रेटींग या अॅपला देण्यात आल्यानं, याची विश्वासहार्यता ध्यानात येते. ऑनलाईन शेती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या समोर येतात या अॅपद्वारे कृषी तज्ञांशी सहजतेने संपर्क साधता येतो मार्गदर्शन घेता येते. शेती विषयक विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर व्हिडीओ माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलंय.

 

Iffco Kisan App

बाजारभाव, कृषी मार्गदर्शन व शेतीविषयक सल्ले या अ‌ॅपद्वारे दिले जातात. सर्व प्रभावशाली किसान अ‌ॅप्सपैकी हे अॅप्स Iffco Kisan App होय. ४.८ रेटींग असणारं हे अॅप ५० हजार शेतकऱ्यांनी डाऊनलोड केलंय. भारतातील प्रुमुख १० भाषांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं. फक्त एका क्लिकवर कृषी तज्ञांची मदत घेता येते.

 

Agri Media Video App

साक्षरतेचे प्रमाण शेतकऱ्यांमध्ये कमी आहे. त्यासाठी व्हिडीओ माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येतं. ५ पैकी ४.८ रेटींग या

शेतकऱ्यांना ऑनलाईन व्यासपीठ देण्याच काम या अॅपद्वारे प्रभावीपणे सुरु आहे. शेती विषय समस्यांचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करुन त्यातून मार्गदर्शन घेता येतं. नवीन तंत्रज्ञान, अधूनिक शेतीपद्धती, यशस्वी शेतीप्रयोग, सरकारी योजना अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. दहा हजार शेतकऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड केलंय.

 

FarmerBee – RML farmer

वापरायला सुलभ आणि साईस्कर असणारं FarmerBee  App शेतकऱ्यांसाठी उपयूक्त ठरतंय. विशेष म्हणजे पिकांच्या वेगवेगळ्या पातळीवरील मार्गदर्शन तज्ञांकडून घेता येतं.

भारततल्या दहा वेगवेगळ्या भाषांमध्ये शेतकऱ्यांना सुविधा देणार हे कृषी अॅप ४५० प्रकारच्या पिकांमधून शेतकरी आपल्या पिकावर योग्य ते मार्गदर्शन घेवू शकतो.१३०० बाजारपेठा आणि ३५०० हवामानांची स्थानकं, बाजार भाव आणि हवामान अंदाज या विषयांची सखोल माहिती इथे मिळते.5 लाख जणांनी हे अॅप डाऊनलोड केलंय.

 

Kisan Yojana

शासकीय योजना या नेहमी ठरावीक कालावधीसाठी येतात. त्या सर्वसामान्यांपर्यंत वेळेत पोहचतं नाहीत. शेतीची काम सोडून तहसिलदार, जिल्हा परिषद कार्यलायात येरझाऱ्या घालणं शेतकऱ्याला परवडं नाही. अनावश्यक उर्जा त्यावर खर्च होते यासाठी. Kisan Yojana बनवण्यात आलंय.

शेती विषयक शासकीय योजनांची माहिती या अॅपद्वारे दिली जाते. ग्रामीण जनता आणि सरकाय यांच्यातील अंतर कमी करण्याचे काम यातून होते. सरकारी कार्यलास  भेटी देण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा यातून वाचतो.