क्रांतिकारी सुभाषबाबूंची रोमांचक लव्ह स्टोरी

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील मोठं नाव सुभाषचंद्र बोस. त्यांचा जन्मदिवस २३ जानेवारी १८९७ साली ओडीसा मधील कटक शहरात झाला. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा.. ही त्यांची ललकार देशातील तमाम क्रांतीकारी तरूणांना दिशा देणारा ठरला.
त्यांच्याविषयी अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मुळात त्यांच्या मृत्यू विषयीही अजूनही गुढ काही उकललेलं नाही. त्यावर अनेक पुस्तक व थेअऱ्या प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांच्या आणि हिटलरच्या भेटीविषयीही अनेकांनी लिहून ठेवलं आहे.
पण त्यांच्या लव स्टोरी विषयी कुणाला जास्त माहित नाही.
खरंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं व्यक्तीमत्व प्रचंड आकर्षक व प्रभावी होती. त्यांचं अनेक भाषावर असलेलं प्रभुत्व, प्रचंड ज्ञान, करारी नजर यामुळं त्यांची छाप पडायची. त्यांच्यावर प्रभावित अनेक मुली प्रभावित झाल्या नसतील तर नवलंच. पण या सुभाषबाबूंना एका ध्येयानं पछाडलेलं होतं. ते म्हणजे देशाचं स्वातंत्र्य. या सगळ्या कालखंडात त्यांनी अनेकवेळा विदेश प्रवास केला. युरोपात राहिले. तिथेच त्यांना एका मुलीवर प्रेम झालं.
सुभाष बाबूंच्या क्रांतीकारी विचारांना घाबरून इंग्रजांनी सुभाषबाबूंना देशातून निर्वासित केलं. मग ते युरोपात गेले. युरोपातील ऑस्ट्रीया येथील वियेना शहरात राहायले गेले. त्यांनी तिथूनही आपले क्रांतीकारी विचार भारतातील त्यांच्या स्वकीयांना पत्राद्वारे पाठवायला सुरूच ठेवले. या काळात त्यांना एका टायपिस्ट व आसिस्टंटची गरज होती. तेंव्हाच त्यांच्या एका मित्राने त्यांना मिस एमिली शांक्ले या महिलेसोबत त्यांची भेट घालून दिली.
सभाषबाबूंसाठी एमीली यांनी काम करण्यास सुरूवात केली. सुभाष बाबूंचे विचार, तत्वनिष्ठा , भाषा व तत्वज्ञानावरील पकड, मातृभूमीवरील प्रेम पाहून एमिली त्यांच्याकडे आकर्षित झाली. सुभाष बाबूही एमिलीच्या प्रेमात पडले. दोघांच्या प्रेमाला एक उंची होती. त्यामागे विचार होता. या दरम्यान त्यांनी युरोपही फिरला.
१९३६ मध्ये सुभाष चंद्रबोस परत आपल्या मायदेशी परतले.  ते कामात प्रचंड व्यस्त झाले. या सर्व धावपळीतही त्यांनी एमिलीला पत्र लिहले.
त्यांनी लिहले पत्र प्रचंड आशयघन व रोमँटिक होते. स्वातंत्र्यानंतर जेंव्हा हे पत्र उजेडात आली तेंव्हा अनेकांनी या पत्रांना उच्च साहित्याचा दर्जा असलेलं मानलं.
“   तु पहिला स्त्री आहे, जिच्यावर मी प्रेम केलं आहे, ईश्वराकडून माझं एकच मागणं असेल की, तच माझ्या जीवनातील शेवटची स्त्री असावी” “ मी कधीच विचार केला नव्हता की कोणत्या स्त्रीचं प्रेम मला बांधून ठेऊ शकेल. याअगोदर खुप व्यक्तींनी मला प्रेमाच्या बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला पण मी कुठेच लक्ष दिलं नाही, परंतु तु मला आपलं करून टाकलंस.”
शर्मिला बोस यांनी लिहलेल्या  ‘लव इन द टाइम ऑफ वारः सुभाष चंद्र बोस जर्नी टू नाजी जर्मनी’  या पुस्तकानुसार  1937  मध्ये  सुभाष बाबु एमिली यांच्याकडे गेले. ऑस्ट्रीया के बडगस्टीन शहरात त्यांनी गुप्त पद्धतीनं लग्न केलं. आणि काही दिवसातंच म्हणजे जानेवारी १९३८ साली ते भारतात परतले.
सुभाष बाबूंनी आपल्या लग्नाविषयी भारत स्वातंत्र्य झाल्याशिवाय कुणालाही सांगायचे नाही असे ठरवले होते. परंतु त्यांच्या लग्नाविषयी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना माहित होतं, असा अनेक इतिहासकारांचा दावा आहे.
१९४२ मध्ये सुभाष बाबूंना कन्यारत्न प्राप्त झाला. त्यांनी या मुलीचं नाव अनिता ठेवलं.
परंतु दुर्दैवानं पत्नी आणि मुलीचा सहवास त्यांना लाभला नाही. ८ जानेवारी १९४३ साली सुभाष बाबू जेंव्हा जर्मनीवरून जापानकडे रवाना झाले. तेंव्हाचं त्यांना आपल्या मुलीला व पत्नीला शेवटचं पाहता आलं होतं. नंतर १९४५ साली प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि या बातमीनं त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती.
सुभाषबाबूंच्या भावाचे नातू सुगाता बोस यांनी एक सुभाष चंद्र बोसांच्या जीवनावर पुस्तक लिहले आहे. हिज मैजेस्टी ऑपोनेंट. या पुस्तकात त्यांनी सुभाष बाबूंच्या परिवाराने १९४८ मध्ये वियेना मध्ये जाऊन एमिली आणि अनिता यांची भेट घेतल्याचं म्हणलं आहे. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना भारतात येण्यासाठीही आग्रह धरला होता. परंतु एमिली यांनी येणास नकार दिला होता. कारण त्यांच्या आई त्यावेळेस आजारी होत्या. त्यामुळे त्या भारतात आल्या नाहीत. पण नंतरच्या काळात अनिता कोलकत्ता आल्या. परंतु सुभाषबाबुंनी ज्यांच्यावर प्रेम केलं. त्या कधीच भारतात येऊ शकल्या नाहीत.