जगभरातल्या स्त्रियांचा विचार केला तर स्त्रिया अनेक माध्यमातून भरारी घेताना दिसतात. अनेक क्षेत्रात भारतातल्या स्त्रियांनीही जबरदस्त कामगिरी करून देशाचं नाव मोठं केलं आहे. पण भारतातल्या काही समाजात मात्र स्त्रियांच्या वाट्याला आजही हीन वागणूकच येताना दिसते. महाराष्ट्रातल्या काही भटक्या समाजांमध्ये विशेषतः कंजारभाट समाजात स्त्रियांना लग्नाच्या आधी कौमार्य सिद्ध करावं लागतं. लग्न ठरण्यापासूनच्या सगळ्याच पद्धती स्त्र्रिला हीन […]