महाराष्ट्राच्या मातीला शौर्य आणि वीरतेचा मोठा वारसा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला शूर आणि पराक्रमी राजा म्हणजे महाराज यशवंतराव होळकर. पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफगावला 1776 साली महाराज यशवंतराव होळकरांचा जन्म झाला. आज मात्र यशवंतराव होळकरांच्या जन्मस्थानाकडे कुणाचंही लक्ष नसल्याचं स्थानिक आणि इतिहासप्रेमींकडून सांगितलं जातं. सुभेदार मल्हारराव होळकरांना जुन्नर प्रांतातल्या वाफगावची जहागिरी […]